Surya Ketu Yuti: कन्या राशीत होणार सूर्य-केतूची युती; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Sun And Ketu Conjunction In Virgo: सूर्य आणि केतू या दोन्ही ग्रहांचा संयोग अशुभ मानला जातो. मात्र यावेळी काही राशींवरही याचा शुभ प्रभाव पडणार आहे. 16 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 13, 2024, 10:40 AM IST
Surya Ketu Yuti: कन्या राशीत होणार सूर्य-केतूची युती; 'या' राशींचं नशीब फळफळणार title=

Sun And Ketu Conjunction In Virgo: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्रामध्ये सूर्य आणि केतू या दोन्ही ग्रहांना विशेष महत्त्व आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. तर केतू हा मायावी आणि पापी ग्रह म्हणून ओळखला जातोय.

सूर्य आणि केतू या दोन्ही ग्रहांचा संयोग अशुभ मानला जातो. मात्र यावेळी काही राशींवरही याचा शुभ प्रभाव पडणार आहे. 16 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 17 सप्टेंबर रोजी या राशीमध्ये सूर्य आणि केतूचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग कोणत्या राशींच्या व्यक्तींना मालामाल करणार आहे हे पाहूयात. 

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतू आणि सूर्याचा संयोग अनुकूल राहणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमचा व्यवसाय आणि मालमत्ता वाढेल आणि यावेळी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. विवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलांकडून तुम्हाला लाभ आणि आनंद मिळू शकणार आहे. 

धनु राशि (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी देखील सूर्य आणि केतूची संयोग शुभ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायातही फायदा होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित करार आता साध्य होऊ शकतो.

कर्क राशि (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना सूर्याची विशेष कृपा असणार आहे. व्यावसायिकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. जीवनशैलीत कोणताही बदल होणार नाही. तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता. नोकरदार आणि व्यापारी वर्गाला लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )