राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रगतीचे मार्ग खुले होणार

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Sep 14, 2020, 08:49 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रगतीचे मार्ग खुले होणार  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत आहात, तर धीर धरा. सर्वकाही सुरळीत होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या गोष्टीत फायदा मिळू शकतो. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. व्यापारासाठी दिवस चांगला आहे. 

वृषभ- तुमच्या मताचा इतरांवर प्रभाव पाडू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्याहून कनिष्ठ लोकांपासून सावध राहा. मित्रांची मदत मिळणार आहे. 

मिथुन- जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धैर्यानं पुढे जा. स्वत:च्या बळावर निर्णय़ घ्या. यश तुमच्याच मार्गावर आहे. 

कर्क- पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करा. जास्तीचं काम करा, मदत मिळेल. जुनी कामं मार्गी लावा. नशिबाची साथ मिळणार आहे. इतरांचं म्हणणं समजून घ्या. 

सिंह- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. पैशांच्या बाबतीत फार विचार करु नका. जोडीदारासोबत गुंतवणुकीचा विचार करा. 

कन्या- आजचा दिवस चांगला आहे. भावनांवर ताबा ठेवा. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वेळेवर कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

तुळ- परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. धैर्यानं पुढे जा. चांगल्या व्यवहारांवर विश्वास ठेवा. कामात मन रुळेल. संयमानं पुढे जा. 

वृश्चिक - अनेक कामं पूर्णत्वास जातील. चांगल्या व्यक्तींचा तुमच्यावर प्रभाव असेल. सर्वांनी नम्रतेने वागा. मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. 

धनु- कोणा एका मित्राचा भागीदारीमध्ये फायदा मिळणार आहे. दुसऱ्यांप्रती भावना व्यक्त करा. चांगल्या कामाचं फळही चांगलंच मिळणार आहे. 

मकर- काही नव्या योजनांमध्ये बदल करावे लागतील. पण, बदल फायद्याचे ठरतील. शांततेनं पुढे जा. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. जुनी कामं मार्गी लावा. 

 

कुंभ- आजचा दिवस तुमच्यासाठी रचनात्मक आहे. मनात असणाऱ्या गोष्टींसाठी इतरांची मदत होईल. मित्रांसोबतची नाती आणखी दृढ होतील. वरिष्ठांपुढे तुमची वाहवा होईल. 

मीन- मेहनतीचं फळ मिळेल. धीरानं काम करा. वेळेला महत्त्व द्या. भाग्योदयाचा योग आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. जमिन किंवा घर खरेदीसाठी एक पाऊल पुढे जा. फायदा होईल.