Mercury Retrograde Aries: एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्याप्रमाणे ग्रह गोचर करतात, त्याप्रमाणे वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. बुद्धिमत्ता देणाऱ्या बुध ग्रहाच्या स्थितीत होणारा बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतो.
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध 2 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:18 वाजता मेष राशीमध्ये वक्री होणार आहे. मेष राशीत बुध वक्री असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मंगळाच्या राशीत बुधाच्या वक्री गतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे, ते पाहुयात.
बुधाच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. यासोबतच नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते बऱ्यापैकी असणार आहे.
या राशीमध्ये बुध सातव्या घरात वक्री होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. बुध व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर करेल. सट्टेबाजी आणि व्यापाराशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.
या राशीमध्ये, बुध पाचव्या घरात वक्री आहे. करिअरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती आणि पगारवाढीच्या अनेक शक्यता आहेत. कामासंबंधी काही प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. तुम्हाला अधिक पैसे कमविण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफ देखील चांगले राहणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )