Somwar Upay: चमत्काराहून कमी नाही, पाच पानांचं बेलपत्र; खुद्द देवादिदेव महादेव दाखवतील यशाचा मार्ग

Belpatra Upay: शंकराची पूजा करताना बेलपत्राचा वापर करताय? एकदा त्याच्या परिणामांविषयीसुद्धा माहिती मिळवा. जाणून व्हाल चकीत! 

Updated: Feb 6, 2023, 02:44 PM IST
Somwar Upay: चमत्काराहून कमी नाही, पाच पानांचं बेलपत्र; खुद्द देवादिदेव महादेव दाखवतील यशाचा मार्ग  title=
Somwar Upay Mahashivratri 2023 shankar puja rules belpatra

Belpatra Upay: महाशिवरात्र (Mahashivratri 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच आता त्या दिवसाचे मुहूर्त आणि वेळा पाहून त्याच परिनं देवाची पूजाअर्चा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. त्यासाठी ज्योतिषविद्येच्या (Astrology) अभ्यासकांचा आधार घेतला जात आहे. शंकराची पूजा पूर्णत्वास जाण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र. महाशिवरात्रीच्या आधी आम्ही तुम्हाला याच बेलपत्राच्या एका खास प्रकाराचं महत्त्वं सांगणार आहोत. (Somwar Upay Mahashivratri 2023 shankar puja rules belpatra)

शंकराची (Shankar) पूजा करत असताना बेलपत्राचा आवर्जून वापर केला जातो. आतापर्यंत आपण सर्वांनीच तीन पानं असणारं बेलपत्र पाहिलं आहे, शिवलिंगावर वाहिलंही आहे. पण, तुम्हाला माहितीये का एक असंही बेलपत्र आहे जे अतिशय शुभ असून फार दुर्मिळही आहे. शंकराच्या पुजेसाठी या प्रकारच्या बेलपत्राचा वापर प्रचंड फलदायी ठरतो असंही म्टलं जातं. हे असतं, पाच पानं असणारं बेलपत्र. 

तुम्हाला असं बेलपत्र मिळालं तर... 

ज्योतिषविद्येमध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला 5 पानं असणारं बेलपत्र मिळाल्यास हे शुभसंकेत असतात. ही पाच पानं ब्रह्मा, विष्णु, महेश, गणपती आणि देवी भगवतीचं प्रतीक असतात. त्यामुळं या बेलपत्राला शंकरापुढे अर्पण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शंकराचा वरदहस्त कायम आपल्यावर राहतो. 

धनप्राप्ती आणि संतासुखासाठी बेलपत्र 

पाच पानांच्याच बेलपत्रामध्ये इच्छा पूर्ण करण्याची ताकद असते असं नाही. तर, तीन पानं असणाऱ्या बेलपत्रानं शंकराची मनोभावे पूजा केल्यासही अनेक फायदे दिसून येतात. धनप्राप्तीसाठी तुम्ही सोमवारी शंकराची पूजा करताना बेलपत्र दुधात डुंबवून वाहणं अपेक्षित असेल. तर, संतानसुखासाठी तुमचं वय असेल तितकी बेलपत्र घेऊन ती दुधात डुंबवून शिवलिंगावर वाहा, याचा नक्कीच फायदा होईल. 

विवाहयोगातील दिरंगाई टळेल 

एखाद्या व्यक्तीला विवाहयोगच येत नसेल, तर शंकराच्या मंदिरात दर सोमवारी सकाळी शिवलिंगावर जलाभिषेक करून 108 बेलपत्र अर्पण करा. हे करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण करा. 

आरोग्याच्या समस्या होतील दूर 

आरोग्याच्या काहीही समस्या असतील तर, 108 बेलपत्र चंदनात बुडवून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हे करत असताना शंकरापुढे चांगल्या आरोग्याची कामना करा. आरोग्यविषयक समस्या यामुळं सहजपणे दूर होतील. 

हेसुद्धा वाचा : Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी

शंकराच्या पिंडीवर बेल वाहताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भोळ्या शंकरापुढे मनातील इच्छा मांडत असताना मनात कोणतीही कटुता न ठेवता पूजाअर्चा तरा. परिणाम तुमच्याच बाजूनं असतील. 

(वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर अवलंबून असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)