मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांसोबतच व्यक्तीच्या राशीचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि भविष्यावरही पडतो. ज्योतिष शास्त्रात अशा 5 राशींबद्दल सांगण्यात आले आहे, या पाच राशीचे लोक मनापासून मैत्री करतात, परंतु या पाच राशींच्या व्यक्ती शत्रूत्वही तितक्याचं कठोरतेनं जपतात. ते आपल्या शत्रूंना माफ करत नाहीत, परंतु नेहमी लक्षात ठेवतात आणि संधी मिळताचं घडल्या घटनेचा बदला देखील घेतात.
मेष (Aries)
मेष राशीच्या लोकांना फार गर्व असतो. या राशीचे लोक स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजात. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार देखील फार कमी असतो. कोणी यांच्याबद्दल काही बोललं तर या राशीच्या व्यक्ती समोरच्याला शत्रू समजतात.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीचे लोक उत्तम मित्र म्हणून सिद्ध होतात. ते कायम आनंदी आणि प्रमाणिक असतात. पण या राशीच्या लोकांना कोणी त्रास दिला, तर या राशीच्या व्यक्ती समोरच्याचा बदला घेतात.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांचे शत्रू नसतात. पण कोणी त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवल्यानंतर, सिंह राशीच्या व्यक्ती त्या लोकांपासून कायमचे दूर होतात. या राशीच्या व्यक्ती रागात काहीही करतात.
वृश्चिक (Scorpio)
या राशीचे लोक स्वर्थी असतात. प्रत्येकाकडून काम करून घेणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असते. जेव्हा ते हे करू शकत नाहीत किंवा त्यांच्या कामात कोणाची चूक आढळली तर ते सूड उगवतात.
धनु (Sagittarius)
धनु राशीचे लोक फक्त त्यांच्या करियर आणि कामाला महत्त्व देतात. पण एखाद्यावर राग आला तर राग दडपून ठेवू नका. ते लवकरात लवकर बदला घेतात.
(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)