Love Marriage मधील अडचणी ज्योतिषीय उपायाने मार्गी लावा, जाणून घ्या

सध्याच्या काळात मुलंमुली आवडीनुसार लग्न करतात. मात्र लग्न बंधनात अडकण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Updated: Jul 12, 2022, 06:50 PM IST
Love Marriage मधील अडचणी ज्योतिषीय उपायाने मार्गी लावा, जाणून घ्या title=

Love Marriage Astrology: सध्याच्या काळात मुलंमुली आवडीनुसार लग्न करतात. मात्र लग्न बंधनात अडकण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे अनेकदा वेगळं व्हावं लागतं. घर, समाजच नाही तर ग्रह आणि नक्षत्रांमुळे प्रेमात अडथळे येतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर ज्योतिषशास्त्रातील उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. जर तुम्हाला प्रेमानंतर लग्न करायचे असेल तर हे ज्योतिषीय उपाय करा. 

हे रत्न घाला

जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर डायमंड किंवा ओपल घालण्याचा प्रयत्न करा. तसेच श्रावण सोमवारचे व्रत ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी 16 सोमवारीही व्रत करावे. तसेच जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे गौरी शंकर अर्धागिंनी यथा त्वं शंकर प्रिया तथा माम कुरू कल्याणी कान्त कान्ता सुदुर्लभम्’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.

चंद्राला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी करा

कुंडलीत पाचवे घर आणि सातवे घर लग्नासाठी आहे.पाचव्या घराचा स्वामी चंद्र आहे. अशा स्थितीत चंद्राला बलवान बनवण्यासाठी चांदीच्या अंगठीत मोती घाला. यामुळे प्रेमविवाहाचा योग निर्माण होतो.

मुलींनी हा उपाय करावा

प्रेमात अडथळे येत असतील तर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र परिधान करून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. तसेच स्फटिकांची माळ घालून 'ओम लक्ष्मी नारायण नमः' या मंत्राचा जप करावा. त्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता निर्माण होते.
 
गणपतीचं पूजन करा

कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या बुधवारी गणपतीची पूजा सुरू करावी आणि दर बुधवारी दुर्वा, पिवळे लाडू, सिंदूर आणि रोळीने त्यांची पूजन करावे. यामुळे हवा असलेला जीवनसाथी मिळेल.

प्रेमविवाहातील अडथळा दूर करा

प्रेमविवाहात अडचण असल्यास रविवारी 7 सुपारी, 7 हळदीच्या गाठी, 7 गुळाचे खडे, 70 ग्रॅम हरभरा, 7 पिवळी नाणी आणि एक यंत्र पिवळ्या कपड्यात घेऊन पार्वती देवीच्या समोर ठेवून पूजा करावी.  तेथे 40 दिवस राहू द्या आणि नंतर प्रियकराला द्या. यामुळे प्रेमावरील दृष्टी किंवा अडथळा दूर होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)