शुक्रवारी तांदुळ आणि हळदीचा 'असा' वापर करा, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

शुक्रवारी तांदुळ आणि हळदीचं इतकं काय महत्त्वं, एकदा पाहाच...

Updated: Oct 7, 2022, 07:13 AM IST
शुक्रवारी तांदुळ आणि हळदीचा 'असा' वापर करा, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही  title=
Shukrawar Upay remedies to become crorepati usage of rice and haldi

Friday Remedies: लक्ष्मीला (Devi Laxmi) धनाची देवी म्हणून पाहिलं जातं. असं म्हणतात की लक्ष्मीची कृपा होण्यासाठी अनेकजण नियमित पूजाअर्चा करण्यासोबत काही ज्योतिष उपायांचाही आधार घेतात. देवी आपल्या मनोकामना ऐकून त्या पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी हातभार लावते अशीच अनेकांची मान्यता. ज्योतिषात असेही काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळं घरातील वातावरण शुद्ध होतं. लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर (Family), आप्तजनांवर कृपा व्हावी, असं तुम्हालाही वाटत असेल तर खालील उपाय नक्की करा.  (usage of rice and haldi in astrology)

- लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर असावा असं तुम्हाला वाटत असेल तर, 21 तांदळाच्या दाण्यांना हळदीनं रंगवा. या दाण्यांना लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून लक्ष्मी मातेजवळ ठेवा. देवीची पूजा केल्यानंतर सिंदूर लावून ही पोतडी तिजोरी किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा, काही दिवसांतच याचे परिणाम दिसून येतील. 

- तुमचेही पैसे येताच खर्च होत असतील तर वड किंवा पिंपळाची 21 पानं घ्या आणि यावर श्री राम असं लिहा. शुक्रवारच्या दिवशी ही पानं नदीत प्रवाहित करा. सलग 5 आठवडे हा उपाय केल्यास त्यामुळं फायदा होईल.

अधिक वाचा : Chanakya Niti : महिलांना पुरुषांच्या 'या' सवयी आवडतात

 

- घरातील (Negative Energy) नकारात्मक उर्जा भरभराटीमध्ये अडथळा ठरते. अशा वेळी संध्याकाळच्या समयी घरात पाणी शिंपडल्यानं नकारात्मकता दूर होते. धूप दाखवल्यामुळंही घरातील नकारात्मक शक्ती दूर जातात. 

- धनलाभासाठी नियमित स्वरुपात लक्ष्मीची पूजा करा. महालक्ष्मी पाठ करा. पाठाच्या शेवटी देवीला गुलाबाचं फूल अर्पण करा. 

- खर्चांवर ताबा ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्यामुळं देवी नाराज होते आणि अन्नधान्याचा तुटवडा जाणवतो. 

(वरील उपाय सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)