शुक्र गोचरामुळे 9 दिवसानंतर 'या' राशींची होईल आर्थिक भरभराट! तुमची रास आहे का? वाचा

 ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनतर राशी बदल करतो. ग्रहांच्या गोचरामुळे राशिचक्रातील सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. येत्या 18 ऑक्टोबर 2022 रोजी सुख, संपत्ती आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपली राशी बदलून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Updated: Oct 9, 2022, 04:30 PM IST
शुक्र गोचरामुळे 9 दिवसानंतर 'या' राशींची होईल आर्थिक भरभराट! तुमची रास आहे का? वाचा title=

Shukra Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनतर राशी बदल करतो. ग्रहांच्या गोचरामुळे राशिचक्रातील सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. येत्या 18 ऑक्टोबर 2022 रोजी सुख, संपत्ती आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपली राशी बदलून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे. 2022 च्या दिवाळीपूर्वी शुक्राचा गोचर 3 राशींसाठी फलदायी ठरेल. चला जाणून घेऊया कोणकोणत्या राशी आहेत ज्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल.

कन्या : तूळ राशीतील शुक्राचा गोचर कन्या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड लाभ देईल. या काळात उत्पन्न वाढेल. अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. ज्या लोकांचे काम मार्केटिंग, शिकवणे, अँकरिंग, राजकारण इत्यादींशी संबंधित आहे, त्यांना खूप फायदा होऊ शकतो. या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल.

धनु : शुक्राचा राशी बदल धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मीडिया, ग्लॅमर, फॅशन डिझायनिंगशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. त्यांना मोठे यश मिळू शकते. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कोजागरी पौर्णिमेला ग्रहांचा अद्भुत संयोग, देवी लक्ष्मीची पूजा आणि राशीफळ जाणून घ्या

मकर : शुक्र ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश मकर राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. कार खरेदी करण्याचा योग आहे. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. ज्यांचे काम संपत्तीशी संबंधित आहे, त्यांना मोठा फायदा होईल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)