Shukra Gochar 2022: सूर्य-शुक्र एकाच राशीत असल्यामुळे 'या' 4 राशींचं फळफळणार नशीब

सूर्य आणि शुक्र एकाच राशीत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

Updated: Aug 28, 2022, 11:06 AM IST
Shukra Gochar 2022: सूर्य-शुक्र एकाच राशीत असल्यामुळे 'या' 4 राशींचं फळफळणार नशीब title=

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची राशी बदलण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. या क्रमाने शुक्र ग्रह दर 23 दिवसांनी आपली राशी बदलतो. सध्या हा ग्रह कर्क राशीत आहे. 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य आधीच याठिकाणी स्थित आहे. 

सूर्य आणि शुक्र एकाच राशीत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. 17 सप्टेंबरपर्यंत शुक्र-सूर्य युती राहील. काही लोकांसाठी सूर्य-शुक्र युती खूप शुभ राहील. त्या राशी चिन्हं काय आहेत अधिक जाणून घ्या.

वृषभ

या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रासोबत सूर्याच्या युतीमुळे धनलाभाचं योग आहेत. त्यांच्या कुटुंबात आनंद येईल. एखादं रखडलेले काम पूर्ण होऊ शकतं. उत्पन्न वाढीबरोबरच सुख-समृद्धीही वाढेल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहील.

मिथुन

या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचं वातावरण असेल.  वैवाहिक जीवनातही कोणतीही अडचण येणार नाही. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कर्क 

सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर ते सोडवता येईल, त्यामुळे अचानक धनलाभ होईल. बिझनेसमध्ये मोठ्या डीलमुळे मोठा नफाही होऊ शकतो. 

कुंभ

या राशीच्या लोकांना सूर्य-शुक्र युतीचा फायदा होईल. वैवाहिक जीवनातील समस्या संपतील. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीतही बदल दिसून येईल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)