भाऊबीजेसाठी हा आहे शुभ मुहूर्त

भाऊबीज...भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण...देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. तसेच यामागे कारणही आहे. 

Updated: Oct 21, 2017, 08:18 AM IST
भाऊबीजेसाठी हा आहे शुभ मुहूर्त title=

मुंबई : भाऊबीज...भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण...देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. तसेच यामागे कारणही आहे. 

हिंदू धर्मानुसार कार्तिक शुक्ल द्वितीयेस यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यम बहिणीच्या घरी जेवायला गेला, म्हणून या तिथीस यमाची पूजा करतात तसेच याच दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जेवण करतो म्हणून त्यास भाऊबीज म्हणतात. 

या दिवशी बहिण भावाला ओवाळते. त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. या वर्षी २१ ऑक्टोबरला भाऊबीजेचा सण आहे. यासाठी दुपारी एक वाजून ३१ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरु होत असून ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत आहे.