Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींवर नकारात्मक परिणामांचं सावट

Vakri Shani Make kendra Trikone Rajyog : शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. शनीच्या वक्रीमुळे अनेक राशींच्या ( Zodiac sign ) व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे. 

Updated: May 22, 2023, 09:44 PM IST
Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींवर नकारात्मक परिणामांचं सावट title=

Vakri Shani Make kendra Trikone Rajyog : सध्या न्याय देवता शनिदेव कुंभ राशीत आहे. मात्र लवकरच ते आपला मार्ग बदलणार आहेत. लवकरच शनीच्या वक्री ( Shani Vakri ) चालीला सुरुवात होणार आहे. 17 जून 2023 रोजी कुंभ राशीत असताना शनी उल्टी चाल चालणार आहे. शनीच्या वक्रीमुळे अनेक राशींच्या ( Zodiac sign ) व्यक्तींवर परिणाम होणार आहे. दरम्यान शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. दरम्यान यावेळी शनी वक्रीमुळे ( Shani Vakri ) चालीमुळे काही राशींच्या व्यक्तींवर याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. 

या राशींना रहावं लागणार सावध

मेष रास

काही राशींच्या व्यक्तींना केंद्र त्रिकोण राजयोग ( kendra Trikone Rajyog ) लाभदायक ठरणार आहे. मात्र मेष राशीच्या लोकांनी शनीच्या हालचालींपासून सावध राहवं लागणार आहे. या दरम्यान तुमच्या आयुष्यात कोणत्या एका कारणामुळे तणाव वाढण्याची शक्यता असते. या काळामध्ये तुमचं पैशाचे नुकसान होण्याची चिन्हं आहेत. तुम्हाला अनपेक्षित अपयश हाती येऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कष्टानंतर देखील यश मिळण्याची शक्यता कमी आहे. 

कर्क रास

17 जून रोजी शनीची चाल (  Shani Vakri ) बदलणार आहे. शनीच्या वक्री चालीचा कर्क राशीवरही परिणाम होणार आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण असणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या समस्येमध्ये वाढ होणार आहेत. आर्थिक क्षेत्रात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये असणारे कलह टोकाची भूमिका घेऊ शकतात. 

तूळ रास

शनीची वक्री चाल (  Shani Vakri ) या राशींच्या लोकांसाठी अशुभ परिणाम देऊ शकते. यावेळी तुमच्या घरातील समस्यांमुळे तुमच्या तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पैसे आणि गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)