Shani Upay : शनिवारी करा 'हे' चमत्कारी उपाय, साडेसातीपासून आर्थिक संकटपर्यंत दूर होणार संकट

 Shani Upay for money : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो. शनिवार हा हनुमानजीला समर्पित केला आहे. याशिवाय आजच्या दिवशी शनिदेवाची आराधना करण्याचाही आहे. शनिदेव नाराज (Shani Sadesati Upay) आल्यास आपल्यावर अनेक संकट कोसळतात. 

Updated: Feb 25, 2023, 08:42 AM IST
Shani Upay : शनिवारी करा 'हे' चमत्कारी उपाय, साडेसातीपासून आर्थिक संकटपर्यंत दूर होणार संकट title=
Shani Sadesati Shani Upay for money Astro Tips shaniwar ke upay in marathi

Shani Upay for money in marathi : हिंदू धर्मात पूजाअर्चेला विशेष महत्त्व आहे. देवाची आराधना करण्यात आपली चूक झाल्यास त्यांची आपल्यावर अकृपा होते. अशात आपल्याला अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. आर्थिक स्थितीही बिकट होते. म्हणून देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मात दिवस ठरविण्यात आले आहे. आज शनिवार म्हणजे आजचा दिवस हा हनुमानजींचा...त्याशिवाय शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी आज शनिदेवाची पूजा अर्चा केली जाते. साडेसाती (Shani Sadesati Upay) सुरु असणाऱ्यांनी आजच्या दिवशी काही उपाय केल्यास त्यांना चमत्कारीक फायदे पाहिला मिळतात. त्याशिवाय असं म्हणतात की शनिदेवाच्या (Shani Remedies) कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अगदी धनलाभही होतो. त्यामुळे आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात (Astro Tips For Money) सांगण्यात आलेले उपाय करा आणि पाहा फायदा...(Shani Sadesati Shani Upay for money Astro Tips shaniwar ke upay in marathi)

शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय 

  1. सूर्योद्यानंतर पिंपळाच्या झाडीची पूजा करा. जल अर्पण करु तेलाचा दिवा लावा. 
  2. भाकरीला तेल लावून शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. 
  3. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला लोबान विशेष आवडतं. त्यामुळे शनिवारच्या दिवशी रात्री घरात लोबान जाळावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. 
  4. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शनी मंदिरात काळे तीळ असलेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 
  5. कुंडलीत साडेसातीचा दोष असेल तर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी शनिदेवाचं मंत्र आणि हनुमान चालिसाचं पठण करा. 
  6. कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी हनुमानजींची पूजा करा. हनुमान चालीसा आणि सुंदरकांड यांचं पठण करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)