Shani Nakshatra Gochar 2023 : 75 दिवस राहूच्या घरी राहणार शनीदेव; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

Saturn Enter Shatabhisha Nakshatra : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले गेले आहेत. शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Jul 30, 2023, 05:40 AM IST
Shani Nakshatra Gochar 2023 : 75 दिवस राहूच्या घरी राहणार शनीदेव; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा title=

Saturn Enter Shatabhisha Nakshatra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात तसंच त्यांच्या नक्षत्र बदल करत राहतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर पडताना दिसतो. हा बदल काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले गेले आहेत.

शनी देव यांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. दरम्यान यावर राहू या मायावी ग्रहाचं वर्चस्व आहे. त्यामुळे शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत. परंतु 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शनीचं हे नक्षत्र गोचर लाभदायक ठरणार आहे. 

वृषभ रास

शनिदेवाचं शतभिषा नक्षत्र तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. वडिलोपार्जित व्यवसाय करतात, त्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त नफा कमवू शकाल. तुम्हाला आर्थिक प्रगती देखील देऊ शकतात. 

सिंह रास 

शनिदेवाचा शतभिषा नक्षत्रात झालेला प्रवेश तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरची साथ मिळू शकते. अचानक कुठूनतरी मोठी रक्कम मिळू शकते. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत त्यांना नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खूश होतील. तुम्ही धार्मिक कार्यात रस घेऊ शकता.

मकर रास

शनिदेवाचा शतभिषा नक्षत्रात झालेला प्रवेश तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला यातही यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. अशा अनेक संधी तुमच्या समोर येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती वाढवू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट ठरू शकतो. कोणत्याही कामात मेहनत कमी पडू देऊ नये. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )