Shani Vakri Effect 2023: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. प्रत्येक महिन्यात काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतता. येत्या काही दिवसांतच नवीन वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष 2024 मध्ये अनेक ग्रह गोचर करण्यासाठी तयार आहेत. याशिवाय काही ग्रह वक्री किंवा मार्गस्थ होणार आहे.
2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. जाणून घेऊया शनीची वक्री चाल कोणत्या राशींसाठी लाभदायक असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 2024 मध्ये मकर राशीला शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा दिसून येणार आहे. शनिदेवाच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्ती वाढू शकणार आहे. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. प्रलंबित पैसे परत मिळतील आणि व्यवसायात अपेक्षित यशही मिळेल.
या राशीच्या लोकांसाठी येणारा काळही खूप फायदेशीर असणार आहे. या लोकांसाठी हा काळ आशीर्वादापेक्षा कमी नसेल. या कालावधीत उत्पन्नात वाढ होईल. यावेळी जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील. कोणत्याही गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. शनिदेवाच्या कृपेने नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी बदल अपेक्षित आहे. या काळात उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
नवीन वर्षात सिंह राशीच्या लोकांवर शनिदेव विशेष आशीर्वाद देणार आहे. या काळात नोकरदार आणि व्यापारी वर्गाला लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी वैवाहिक विकासाचीही अपेक्षा असू शकते. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)