मुंबई : 21 डिसेंबरला 800 वर्षांनी एक अद्भुत खगोलीय घटना घडणार आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठे 2 ग्रह या दिवशी एकत्र येणार आहे. गुरू आणि शनि हे सरळ रेषेत येणार आहेत. ही ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी खगोलप्रेमींमध्ये उत्सूकता दिसत आहे. पण ज्योतिष शास्त्रानुसार याचा वेगवेगळ्या राशींवर देखील परिणाम होणार का? याबाबत ज्योतिष आणि वास्तूशास्त्र तज्ज्ञ वासुदेव सत्रे यांनी माहिती दिली आहे.
प्रत्येक 20 वर्षांनी गुरू आणि शनि एकमेकांच्या जवळ येतात. मात्र यावेळी दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंश अंतर असेल. अशी घटना सुमारे 400 वर्षांनंतर घडत आहे. याआधी 1623 साली गुरू आणि शनि एकमेकांच्या एवढे जवळ आले होते. या वर्षीनंतर 15 मार्च 2080 रोजी रात्री दोन्ही ग्रह एकमेकांच्या इतक्या जवळ येणार आहेत.
सूर्यमालेत गुरू हा पाचवा ग्रह तर शनि हा सहावा ग्रह आहे. गुरू सूर्याची एक परिक्रमा 11.87 वर्षांनी पूर्ण करतो. तर शनिला 29.5 वर्षे लागतात. या खगोलशास्त्री ग्रेट कंजक्शन असं म्हणतात.