Samudrik Shastra: हातावरील अशी चिन्ह देतात शुभ संकेत, व्यक्तींच्या नशिबात असतो पैसाच पैसा!

ज्योतिषशास्त्राप्रमाणे सामुद्रिक शास्त्राचं महत्त्वही अधोरेखित होतं. हातावरील रेषा, उंचवटे, चिन्ह आणि इतर खुणा पाहून भाकीत केलं जातं.

Updated: Oct 7, 2022, 06:00 PM IST
Samudrik Shastra: हातावरील अशी चिन्ह देतात शुभ संकेत, व्यक्तींच्या नशिबात असतो पैसाच पैसा! title=

Samudrik Shastra: ज्योतिषशास्त्राप्रमाणे सामुद्रिक शास्त्राचं महत्त्वही अधोरेखित होतं. हातावरील रेषा, उंचवटे, चिन्ह आणि इतर खुणा पाहून भाकीत केलं जातं. हातावरील चिन्ह भविष्याबाबत मार्गदर्शन करतात. या चिन्हांच्या मदतीने माणसाच्या आर्थिक जीवनाबाबत माहिती मिळते. अशा व्यक्तींना आयुष्यात कोणतीही आर्थिक येत नाही. उलट कामाच्या नवनव्या संधी मिळतात. 

चिन्ह आणि तीळ: सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातात ध्वज किंवा तीळ असतो अशी व्यक्ती धनवान असते. पुरुषाच्या तळहातावर तीळ असेल तर व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि त्याला समाजात नेहमीच मान-सन्मान मिळतो.

स्पष्ट रेषा: जर माणसाच्या हाताच्या रेषा खोल किंवा स्पष्ट असतील तर त्याला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जीवनात आर्थिक अडचणी येत नाही. त्यांच्याकडे पैसा कमावण्याची कला असते.

हातावरील चक्र: सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातात चक्र चिन्ह असते, त्या व्यक्तींना मोठ्या पदावर बसण्याची संधी मिळते. असे पुरुष पैसा आणि नशीब या दोन्ही बाबतीत खूप भाग्यवान असतात.

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौर्णिमेला 4 राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा, तुमची रास आहे का? वाचा

अंगठ्यावरील ठसे: ज्या व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्यावर 'यव' चिन्ह असते, ती व्यक्ती श्रीमंत असतो. अशा लोकांना आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासत नाही. 

(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामन्य मान्यता आणि माहितीच्या आधारे दिली आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)