रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या

Ramlala Pran Pratishtha Muhurat: 22 जानेवारी 2024 रोजी राममंदिर भक्तांसाठी खुले होत आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या दिवशी मंदिरात होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 26, 2023, 09:53 AM IST
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या title=
Ram mandir pran pratishtha on January 22 and 12 30 pm time chosen

Ramlala Pran Pratishtha 2024: अयोध्येत भव्यदिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी 12 ते 1 पर्यंतचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी हाच मुहूर्त का निवडण्यात आला, याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण यामागे एक कारणदेखील आहे. काय आहे ते कारण जाणून घेऊया. 

अयोध्या रामजन्मभूमी वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्याता मार्ग मोकळा झाला. मंदिराच्या बांधकामालाही सुरुवात झाली. मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण 5 दिवसआधीपासूनच म्हणजे 17 जानेवारीपासून विविध सोहळ्यांना सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर रामभक्त रोज या नवीन मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेऊ शकणार आहात. 

भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 10 ते 1 या कालावधीत होणार आहे. या एक तासातच मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. पण मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसंदर्भातील विविध सोहळे व प्रथा 17 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आलेला हा वेळ खूपच खास आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मृगशीर्ष नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र खूपच शुभ मानले जाते. मृगशीर्ष नक्षत्र असताना रामलल्ला मंदिरात विराजनमान होण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त आहे. 

का खास आहे हा मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार मृगशीर्ष नक्षत्र हे शेतीचे काम, व्यवसाय आणि परदेश प्रवासासाठी उत्तम मानले जाते. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या शुभ मुहूर्तावर राम लल्लाचा अभिषेक केल्यास देशाची प्रगती होईल, असं मानले जाते. याशिवाय या शुभ मुहूर्ताचे आरोहण सुद्धा सर्व दोषांपासून मुक्त असते शास्त्रात पाच प्रकारच्या बाधांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये रोग, अग्नि, नियम, चोर आणि मृत्यू यांचा समावेश आहे. रामललाच्या जीवन अभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर एकही दोष नाहीये, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )