Raksha Bandhan : 'या' गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच... जाणून घ्या त्याचं महत्व

ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या वेळी भावाची ओवाळणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की ओवाळणीची आरती बनवताना त्या ताटात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्यात.

Updated: Aug 7, 2022, 07:51 PM IST
Raksha Bandhan : 'या' गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच... जाणून घ्या त्याचं महत्व title=

मुंबई : रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर आला आहे. हा दिवस सगळ्या भाऊ आणि बहिणीसाठी महत्वाचा असतो. कारण या दिवशी बहिण भावाच्या मंगटावर राखी बांधते आणि त्याची ओवाळणी करते. असं म्हणतात राखी बांधुन आणि ओवाळणी करुन बहिण ही भावाच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन तिला देतो. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो.

परंतु ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या वेळी भावाची ओवाळणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की ओवाळणीची आरती बनवताना त्या ताटात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्यात. ज्याचा आपल्याला फायदाच होतोय, त्या गोष्टी कोणत्या आणि त्याचं महत्व काय? चाला जाणून घ्या. 

कुंकुं

तुमच्या राखीच्या ताटात कुंकुं असला पाहिजे. कुंकुंला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे भावाच्या कपाळावर कुंकुं लावल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो. त्याला कधीही पैसे आणि अन्नाची कमतरता राहात नाही. राखीच्या ताटात चंदनाचा समावेश करा. यामुळे बहिणीला भगवान विष्णू आणि गणेशाची कृपा प्राप्त होते. तसेच चंदन भावाला कोणत्याही नकारात्मक गोष्टींपासून लांब ठेवते.

अक्षता

हिंदूंच्या पूजेमध्ये अक्षताचा विशेष वापर केला जातो. तांदळाच्या दाण्याला अक्षता म्हणतात. हे कुंकुमध्ये मिसळून भावाच्या कपाळावर लावले जाते. अक्षत लावल्याने देवी दुर्गा, भगवान गणेश, श्री राम आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

राखी

राखीशिवाय पूजेचे ताट अपूर्ण आहे. ताटात राखी ठेवा. भावांच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी ती देवाऱ्यात ठेवा. श्रीकृष्ण किंवा तुमच्या आवडत्या देवतेला राखी अर्पण करा. राखी हे बहीण आणि भावामधील प्रेम आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहे.

दिवा

राखीच्या ताटात दिवा नक्की ठेवा. त्याचा प्रकाश जीवनात सकारात्मकता आणतो. एक शुभ आणि आनंदी सुरुवात दर्शवतं. भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याची आरती करा. यामुळे भावावरील नकारात्मक प्रभाव दूर होतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)