मुंबई : Raksha Bandhan 2022: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी 200 वर्षांनंतर एक दुर्मिळ मोठा योग आला आहे.
यावर्षी 11 ऑगस्टला म्हणजेच आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधतात, तर भाऊ त्यांना भेटवस्तू देतात. श्रावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा होणारा रक्षाबंधन हा सण यावेळी खूप खास आहे. या दिवशी असा महायोग तयार होत आहे, जो सुमारे 200 वर्षांनी आला आहे.
यावर्षी रक्षाबंधनाला ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत असल्याचे ज्योतिषी सांगतात. खरं तर, यावेळी गुरुदेव बृहस्पति आणि ग्रहांचा सेनापती शनी आपापल्या राशीत प्रवेश करत आहेत. यासोबतच आयुष्मान, सौभाग्य आणि ध्वज योग असेल. याशिवाय शंख, हंस आणि सत्कीर्ती नावाचे राजयोगही तयार होत आहेत. सुमारे 200 वर्षांनंतर ग्रहांचा असा अद्भुत योग होत आहे.
याशिवाय 11 ऑगस्टला पौर्णिमा तिथी आणि श्रावण नक्षत्रासह गुरुवारचा शुभ योग होत आहे. ज्योतिषांच्या मते हा योग खरेदीच्या दृष्टीने शुभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावर वाहने, मालमत्ता, दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर गोष्टींची खरेदी दीर्घकाळ लाभदायक ठरेल. तसेच, कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी हा दिवस खूप चांगला असेल. या दिवशी नवीन व्यवसाय सुरु करणे, नोकरीत सहभागी होणे यासारख्या गोष्टीही करता येतात.
ज्योतिषांच्या मते, भद्राकाल गुरुवारी सकाळी 10:39 वाजता सुरु होईल आणि रात्री 8:52 वाजता समाप्त होईल. असे मानले जाते की भद्र आकाशात असो वा स्वर्गात, भद्र पूर्ण होईपर्यंत रक्षाबंधन करु नये.
11 ऑगस्ट - संध्याकाळी 5:07 ते 6:19 पुच्छ काल
11 ऑगस्ट - 8:52 ते 9:48 चार चोघडिया
11 ऑगस्ट - प्रदोष काळात रात्री 8:52 ते 9:15 पर्यंत