Parivartan Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होताना दिसतात. असंत लवकरच एक खास राजयोग तयार होताना पहायला मिळणार आहे. गुरू आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ 27 डिसेंबर रोजी रात्री 11:40 वाजता धनु राशीत गोचर करणार आहे. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. यासोबतच मकर राशीच्या बाराव्या भावात मंगळाचे भ्रमण होणार असून या राशीत गुरू ग्रह चौथ्या भावात वक्री स्थितीत आहे. यावेळी मंगळ आणि गुरु हे अनुकूल ग्रह असल्यामुळे परिवर्तन योग तयार होणार आहे. मकर राशीत निर्माण झालेला परिवर्तन योग प्रत्येक राशीच्या लोकांवर खास प्रभाव पाडणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा परिवर्तन योग लाभदायक ठरणार आहे.
या राशीच्या लोकांनाही परिवर्तन योगाच्या निर्मितीमुळे विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही बदलांना सामोरे जावे लागू शकते. नवीन नोकरीत बदल होण्याची शक्यता खूप जास्त आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी परिवर्तन योग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो, परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशात मालमत्ता बांधण्याची इच्छा पूर्ण होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
परिवर्तन योगाच्या निर्मितीमुळे भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही तुमची स्वप्नं आणि ध्येयं साध्य करू शकता. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. या राशीच्या लोकांना अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )