या व्यक्तींच्या जीवनात कधीच नसते शांतता, भीतीने जगतात आयुष्य कारण...

आनंदी आयुष्य कसं जगायचं, या गोष्टींचा त्याग केल्यामुळे आयुष्य होईल सोप...  

Updated: Feb 13, 2022, 10:40 AM IST
या व्यक्तींच्या जीवनात कधीच नसते शांतता, भीतीने जगतात आयुष्य कारण... title=

मुंबई : चाणक्य नीती कायम आनंदी आयुष्य कसं जगायचं हे शिकवते. यासोबतच आयुष्यात कोणत्या गोष्टी टाळण्याच्या याचा सल्लाही देते. जीवनात अशा अनेक गोष्टी आहे, ज्यामुळे आयुष्य कठीण वाटू लागतं. जर एखादी व्यक्ती या गोष्टींपासून दूर राहिली नाही तर अशा व्यक्तींचे जीवन खूप दुःखी आणि संघर्षमय बनते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून आहोत, ज्यापासून माणसाने नेहमी दूर राहावे.

आळस
चाणक्य नीतीनुसार माणसाने नेहमी आळसापासून दूर राहावे. कारण आळस माणसाला इतरांवर अवलंबून बनवतो, ज्यामुळे प्रतिभेचा नाश होतो. व्यक्ती स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतो. अशा व्यक्तीचे जीवन ध्येयहीन होते. तो नेहमीच दुःखात जगला आहे.

ढोंग
ढोंग ही अशी गोष्ट आहे जी माणसाला खूप खोटे बोलायला आणि चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते. ढोंग करणारी व्यक्ती कधीही शांततेत राहू शकत नाही. आपले सत्य समोर येण्याची अशा व्यक्तींच्या मनात कायम भीती वाटते.

राग
रागावलेली व्यक्ती इतरांपेक्षा स्वतःचे नुकसान करते. एवढंच नाही तर इतरांसमोर स्वतःची प्रतिमा देखील खराब होते. लोक त्याच्यापासून दूर राहतात. अशा व्यक्तींवर वाईट काळात एकटं राहण्याची वेळ येते आणि या गोष्टीचा त्रास त्यांना होतो. 

अहंकार
अहंकारामुळे रावणसारख्या बलाढ्य राक्षसाचाही नाश झाला. अहंकार माणसाला सत्यापासून दूर ठेवतो. तो योग्य आणि चुकीचा फरक करू शकत नाही. अशा लोकांना आयुष्यात खूप त्रास होतो.

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)