Morpankh and its benefits: घरात मोरपीस ठेवण्याचे 5 भन्नाट फायदे, जाणून घ्या

श्रीकृष्णाचं मोरपीस जेवढं सुंदर आहे तेवढंच ते प्रभावशालीही आहे. 

Updated: Sep 19, 2022, 09:25 PM IST
Morpankh and its benefits: घरात मोरपीस ठेवण्याचे 5 भन्नाट फायदे, जाणून घ्या  title=

Morpanka and its upay: श्रीकृष्णाचं मोरपीस जेवढं सुंदर आहे तेवढंच ते प्रभावशालीही आहे. मोरपिसाशिवाय भगवान श्रीकृष्णाची पूजा पूर्णच होऊ शकत नाही. मोपीस घरात ठेवल्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास मदत होते (benefits of keeping peacock feather). ज्योतिष शास्त्रानुसार श्रीकृष्णाची सर्वात आवडती वस्तू मानल्या जाणाऱ्या मोराच्या पिसाचा वापर करून मोठ्या संकटांपासून मुक्ती मिळू शकते ( Shri krishna and morpankha) . चला जाणून घेऊया मोराच्या पिसांशी संबंधित काही वापरांबाबत. 

शत्रूही होईल मित्र 

तुम्ही कुणा विशिष्ट इसमापासून त्रस्त असाल तर मंगळवारी किंवा शनिवारी मोरपिसावर हनुमानाच्या डोक्यावरील शेंदुराने त्या व्यक्तीचं नाव लिहा. रात्रभर हे मोरपीस देवघरात ठेवा. सूर्यादिवशी सकाळी वाहत्या पाण्यात हे मोरपीस सोडून द्या. ही प्रक्रिया करताना तुम्हाला गुप्तता बाळगावी लागेल. या उपायाने तुमचा शत्रूही तुमचा मित्र होईल.  

धनलाभ (Dhanlabh) 

धनलाभासाठी मोरपिसाचा उपाय फायदेशीर ठरतो. रस्ताही एक मोरपीस राधा कृष्णाच्या मंदिरात ( Radha Krishna Temple )  ठेवून त्याची दररोज पूजा करा. चाळीस दिवस दररोज पूजा केल्यानंतर हे मोरपीस तुमच्या तिजोरीत ठेवा. यान धनप्राप्ती होते असं या विषयातील जाणकार सांगतात. धनप्राप्तीसोबतच तुमची अनेक अडकलेली कामही पूर्ण होण्यास मदत होईल. 

कालसर्प दोष (Kalsarpa Dosh): 

पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णानेही कालसर्प योगापासून मुक्तीसाठी मोरपीस आपल्या मुकुटात धारण केलेलं. मोराचं आणि सापाचं वैर जगजाहीर आहे. अशात उपाय म्हणून तुम्ही 7 मोरपिसे एका उशीच्या खोळीमध्ये टाकून त्या उशीवर झोपलं पाहिजे. कालसर्पावर हा उपाय फायद्याचा ठरू शकतो.  

ग्रह शांती (Graha Shanti) : 

ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी ज्या ग्रहाचा अशुभ प्रभाव ( Grahadosh remedie आहे त्या ग्रहाचा मंत्र 21 वेळा म्हणावा. हा जाप झाल्यानंतर मोरपिसावर पाणी शिंपडावे. यानंतर हे मोरपीस पूजेच्या ठिकाणी ठेवा, काही दिवसात तुम्हाला फायदा दिसेल. 

नजरदोष (Nazardosh) :

नवजात मुलांना चटकन कुणाचीही नजर लागते असं म्हणतात. लहान मुलांना यापासून दूर ठेवायचं झाल्यास एका चांदीच्या ताबीजमध्ये मोरपीस मुलांच्या डोक्यापाशी ठेवा. यामुळे मुलांना भीती वाटणार नाही.

(विशेष नोंद - वरील बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा दैनंदिन जीवनात वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

morpankha totke 5 amazing benefits of keeping peacock feather at home