Chandra Ketu Yuti: 100 वर्षांनंतर कन्या राशीत चंद्र-केतूची युती; 'या' राशींच्या अडचणी वाढणार

Chandra Ketu Yuti: 23 फेब्रुवारी रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी चंद्र आणि केतू यांचा संयोग होणार आहे. चंद्र आणि केतू यांच्या संयोगामुळे पौर्णिमेला ग्रहण होईल. जवळजवळ 100 वर्षांनंतर ही युती तयार होत आहे.

सुरभि जगदीश | Updated: Feb 13, 2024, 10:55 AM IST
Chandra Ketu Yuti: 100 वर्षांनंतर कन्या राशीत चंद्र-केतूची युती; 'या' राशींच्या अडचणी वाढणार title=

Chandra Ketu Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती होती. या युतीचे शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येतात. राहू-केतूची वर्षातून दोनदा सूर्यदेव आणि चंद्रावर दृष्टी असते. सध्या केतू कन्या राशीत आहे. 

23 फेब्रुवारी रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी चंद्र आणि केतू यांचा संयोग होणार आहे. चंद्र आणि केतू यांच्या संयोगामुळे पौर्णिमेला ग्रहण होईल. जवळजवळ 100 वर्षांनंतर ही युती तयार होत आहे. जाणून घेऊया चंद्र आणि केतूच्या युतीचा कोणत्या राशींवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना ही युती महागात पडू शकते. कोणतेही काम करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी गमावण्याची भीती राहील. आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

सिंह रास

या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रेमसंबंधात मतभेद वाढू शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामावर कठोर परिश्रम करण्याची वेळ आली आहे. अनावश्यक कामात पैसा खर्च होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, त्यांची फसवणूक होऊ शकते.

तूळ रास

या राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसू शकतो. कोणत्याही योजनेत गुंतवलेले पैसे वाया जाऊ शकतात. फसवणूक होण्याची शक्यता राहील. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद टोकाला जाऊ शकतात. जवळच्या लोकांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामात विविध प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)