Upay for Money : एका रुपयाच्या नाण्यानं बदलतील तुमचे दिवस, 'हा' उपाय केल्यास व्हाल मालामाल...

one rupee coin upay : आपल्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत असेल तर आपली आर्थिक स्थिती ही खूप चांगली असते. पण बुध कमजोर असेल तर सतत पैशाची चणचण जाणवते. अशातच ज्योतिषशास्त्रात एक रुपयाचं नाण तुम्हाला 

Updated: Feb 22, 2023, 04:58 PM IST
Upay for Money : एका रुपयाच्या नाण्यानं बदलतील तुमचे दिवस, 'हा' उपाय केल्यास व्हाल मालामाल... title=
Money Upay or remedies one rupee coin Astro Tips become rich in marathi

Money Upay one rupee coin Astro Tips in marathi : फाल्गुन महिन्यातील गुरुवारी विनायक चतुर्थी...हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. बुधवार हा गणपतीचा वार त्यात गुरुवार विनायक चतुर्थी...या दोन योगायोगामुळे तुमच्यासाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे अमाप पैसा असावा, सगळ्या सुखसुविधा असाव्यात पण पैशाच्या अडचणींमुळे आपण अनेक सुखापासून वंचित राहतो. अशातच ज्योतिषशास्त्रात तुमच्या कुंडलीतील ग्रह पाहिले जातात. बुध हा पैशाशी संबंधित ग्रह आहे तो मजबूत स्थित असेल तर तुम्हाला कधीही पैशाची कमी होतं नाही. पण जर हाच बुध कमजोर असेल तर तुम्हाला सतत पैशासाठी वनवन फिरावं लागतं. अशात फक्त एक रुपयांचं नाणं तुम्हाला श्रीमंत करु शकतं. ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आला हा चमत्कारीक उपाय नक्कीच करु पाहा. (Money Upay or remedies one rupee coin Astro Tips become rich in marathi )

बुधवारी करा हे उपाय!

निरोगी आयुष्यासाठी उपाय 

तुम्हाला सुंदर, निरोगी आणि रोगमुक्त शरीर हवं असेल तर बुधवारी गव्हाच्या भाकरीवर गूळ ठेवून नंतर ते म्हशीला चारा. हा उपाय केल्याने तुमचं काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला निरोगी शरीर मिळेल.

श्रीमंत होण्यासाठी उपाय 

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बुधवारी एक रुपयाचं नाणं घ्या. यानंतर या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा ठिपका लावून शनि मंदिरात ठेवा. तसंच आर्थिक लाभ मिळण्यासाठी शनिदेवाची प्रार्थना करा. 

शूत्रवर मात करण्यासाठी उपाय 

शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दगडावर कोळशाने तुमच्या शत्रूचं नाव लिहा. हा दगड वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने शत्रूंपासून लवकरात लवकर मुक्ती मिळेल.

नवीन व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय 

नवीन व्यवसायात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी सकाळी आंघोळ करून मदारच्या रोपावर जाऊन रोळी-भात घालून विधीपूर्वक पूजा करा. त्यामुळे नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होतील.

कामात यश मिळवण्यासाठी उपाय 

कामं यशस्वी होण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन कडुलिंबाच्या मुळाला नमस्कार करून पाणी अर्पण करा. या उपायमुळे तुम्हाला सर्व कामात यश मिळेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)