Moles on Body: महिलांच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ असणं मानलं जातं शुभ!

Moles on Body: ज्योतिषशास्त्राचा अविभाज्य भाग असलेल्या समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ असणं याचा एक वेगळा अर्थ असतो. जर चेहऱ्यावर कुठेही तीळ असेल तर त्या व्यक्तीचा स्वभावही समजण्यास मदत होते. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 7, 2023, 02:01 PM IST
Moles on Body: महिलांच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ असणं मानलं जातं शुभ! title=

Moles on Body: जवळपास आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर एकतरी तीळ असतोच. पण शरीरावर असलेल्या या महत्त्व काय असतं? शरीरावर असलेल्या तीळाचा परिणाम काय होतो? ज्योतिषशास्त्राचा अविभाज्य भाग असलेल्या समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ असणं याचा एक वेगळा अर्थ असतो. 

समुद्र शास्त्रामध्ये तीळाचं शरीरावर विशेष महत्त्व असल्याचं सांगण्यात आलं आहे आहे. जर चेहऱ्यावर कुठेही तीळ असेल तर त्या व्यक्तीचा स्वभावही समजण्यास मदत होते. जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या बाजूला आणि स्त्रीच्या डाव्या बाजूला तीळ असेल ते शुभ मानलं जातं. जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असण्याचा नेमका अर्थ काय असतो.

डोक्याच्या डाव्या बाजूला तीळ असणं...

समुद्र शास्त्रानुसार, असं मानलं जातं की, ज्या लोकांच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असतो, ते खर्चिक स्वभावाचे असतात. तर या उलट ज्या लोकांच्या उजव्या बाजूला तीळ असतो, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं मानलं जातं. इतकंच नाही तर काही लोकांच्या माथ्यावर अगदी मध्यभागी तीळ असतो. अशा व्यक्ती फार भाग्यशाली मानल्या जातात.

महिलांच्या माथ्यावर तीळ असेल तर..

ज्या महिलांच्या माथ्यावर तीळ असतो, त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असल्याचं मानण्यात येतं. अशा स्त्रिया कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:चा मार्ग करतात. ज्या महिलांच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असतो त्यांच्या जीवनात नेहमी धन-समृद्धी येते.

महिलांच्या डोळ्यांच्या वर तीळ असेल तर...

स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या दोन भुवयांमध्ये तीळ असणे हे शुभ मानलं जातं. अशा महिला खूप भाग्यवान असतात. शिवाय अशा महिला पैशाच्या बाबतीतही भाग्यवान असतात. ज्या महिलांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असते त्यांना आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

पुरुषांच्या माथ्यावर तीळ असणं

ज्या पुरुषांच्या माथ्यावर मध्यभागी तीळ असतो ते त्यांचं काम अगदी चोख करतात, परंतु त्यांना खूप राग येतो. दुसरीकडे ज्या पुरुषांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ आहे त्यांना वयाच्या तिशीनंतर धन आणि समृद्धी मिळते. ज्या पुरुषांच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असतो, त्यांचे आयुष्य तणावात जातं, असं म्हणतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )