मुंबई : तुम्ही हे पाहिलं असेल की, प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावार रेषा असतात. प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावरील या रेषा वेगवेगळ्या असतात आणि या हातावरील रेषांना हस्तरेषाशास्त्रात महत्वाचे स्थान आहे. कारण व्यक्तीच्या हातावरील रेषा या त्याचे भविष्य सांगतात. तुमच्या तळहातावर असलेल पर्वत तुमच्या जीवनाबद्दल बरेच काही सांगतात. हस्तरेखातील शुक्राचा हा पर्वत संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम, आनंद आणि समृद्धीबद्दल बरंच काही सांगतो. अशा स्थितीत जाणून घ्या की तुमच्या ही हस्तरेखावर असा शुक्र पर्वत आहे का? आणि त्याच्या जवळील रेषा किंवा चिन्ह तुमच्याबद्दल आणखी काय काय सांगतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या तळहातावरील शुक्र पर्वत मजबूत आणि उंच असेल, त्याव्यक्तीला जीवनात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही. याशिवाय अशा लोकांना जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळतील.
शुक्र पर्वतावर तीळ विवाहीत जीववासाठी शुभ मानला जात नाही. ज्यांच्या तळहातावर शुक्र क्षेत्रामध्ये तीळ असते, त्यांचे वैवाहिक जीवन त्रासदायक असते. अशा व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही आपल्या पार्टनरसोबत वादात सापडतात.
दुसरीकडे, हस्तरेखाच्या शुक्र पर्वतावर तीळचे चिन्ह चांगले देखील मानले जाते. अशा लोकांची आर्थिक प्रगती होत राहते. एवढेच नाही तर असे लोक व्यवसायातही मोठी आर्थिक प्रगती करतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार अपुष्ट किंवा मजबूत नसलेला शुक्र पर्वत ज्यांच्या हातावर आहे, त्यांच्यासाठी ते चांगले लक्षण नाही. ज्या लोकांच्या तळव्यांवरील शुक्र पर्वत सपाट आहे. त्यांच्या जीवनात सुख-सुविधांचा अभाव असतो. यासोबतच अशा लोकांना शारीरिक वेदनाही होतात. याशिवाय शुक्र पर्वतावर जाळ्याचे चिन्ह असल्यास व्यक्तीला मानसिक त्रासातून जावे लागते.
शुक्र पर्वतावरील त्रिकोणाचे चिन्ह अतिशय शुभ परिमाण देते. ज्या लोकांच्या तळहातावर शुक्र पर्वतावर त्रिकोणचे चिन्ह असते, ते विलासी जीवन जगतात. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते. खरं तर, हस्तरेषाशास्त्रात, हे चिन्ह सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)