Budh Uday : नोव्हेंबर महिन्यात होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळू शकते अपार धन श्रीमंती

Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 19, 2023, 07:20 AM IST
Budh Uday : नोव्हेंबर महिन्यात होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळू शकते अपार धन श्रीमंती title=

Budh Uday In Scorpio: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये काही ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. दरम्यान ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. आगामी काळात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. 

नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत. यामध्ये या राशींना आर्थिक लाभ आणि करिअर-व्यवसायात यश मिळू शकते. जाणून घेऊया बुध ग्रहाचा उदय कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बुध ग्रह तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात उदय होणार आहे. भाग्यवृद्धीमुळे तुम्हाला कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. तुम्हाला नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. 

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ असू शकतो. तुमच्या राशीतून कर्म घरावर बुध ग्रहाचा उदय होईल. या काळात तुमच्या सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. त्याच वेळी, जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायातील अडथळे संपतील. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला यावेळी चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

बुधाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध खूप सौहार्दपूर्ण असतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )