Chanakya Niti: चाणक्य नीतितील धोरणांबाबत लोकांमध्ये आजही कुतुहूल आहे. कारण नीतिशास्त्रातील काही नियम आजच्या युगातही तंतोतंत लागू होतात. इतका काळ लोटूनही चाणक्य नीतिची चर्चा आजही कायम आहे. चाणक्य नीतित अर्थशास्त्र, राजकारण या व्यतिरिक्त सामाजिक जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. नीतिशास्त्रात जेव्हा महिला काही खास काम करत असतील तर पुरुषांनी महिलांकडे बघू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. यापैकी काही बाबींचा उल्लेख धार्मिक ग्रंथात देखील केला गेला आहे.
असं काम करत असलेल्या महिलांकडे पुरषांनी बघू नये!
- महिला जेवण करत असतील तर त्या महिलेकडे पुरुषाने पाहू नये. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. कारण जेवण करत असलेल्या महिलेकडे पाहिलं तर ती अस्वस्थ होते आणि व्यवस्थितरित्या जेवण करू शकत नाही.
- जर एखाद्या स्त्रीला शिंक किंवा जांभई येत असेल, तर अशा महिलेकडे पुरुषाने पाहू नये.
- एखादी स्त्री तिचे कपडे व्यवस्थित करत असेल तर पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. यावेळी पुरुषाने मर्यादेचे भान ठेवून नजर तिथून फिरवली पाहिजे.
- जेव्हा एखादी स्त्री स्वतःला तेलाने मसाज करते, मुलाला दूध पाजते किंवा मुलाला जन्म देते, अशा वेळी पुरुषाने स्त्रीकडे अजिबात पाहू नये.
- जेव्हा एखादी स्त्री डोळ्यात काजळ भरत असेल किंवा श्रृंगार करत असेल तर पुरुषांनी त्या महिलेकडे पाहू नये. पुरुषाने अशा वेळी तिच्याकडे पाहिल्याने तिला अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे पुरुषाने अशावेळी तिथून दूर जावं किंवा नजर फिरवावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)