Mangal Gochar 2023: ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. 16 नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रहाने गोचर केलं आहे. मंगळ ग्रहाने सकाळी 10:04 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे.
दरम्यान प्रत्येक ग्रहाच्या बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. तसाच मंगळाच्या गोचरचा व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशींना त्याचा तोटा होईल. यावेळी 3 राशी अशात आहेत, ज्यांनी या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींनी यावेळी सावध रहावं.
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अनुकूल राहणार नाही. आरोग्य बिघडू शकणार आहे. त्यामुळे आर्थिक खर्च वाढणार आहे. कोर्ट केसेसमुळे त्रास होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. माच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.
वृषभ राशीच्या लोकांवरही मंगळाचा वाईट प्रभाव पडणार आहे. या काळात तुमची तब्येत बिघडू शकते. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्यावरील कामाचा ताणही खूप वाढू शकतो. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक संकट येऊ शकणार आहे. पैशाचा अपव्यय होऊ शकतो. तुमच्या सर्व कामात वारंवार अडथळे निर्माण होतील.
मंगळाच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात संघर्ष वाढेल. जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. भावा-बहिणीशी वाद होऊ शकतो. आत्मविश्वास आणि धैर्य कमी होऊ शकते. या काळात व्यवसाय करणाऱ्यांचंही मोठे नुकसान होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होणार नाही. तुमचे खर्च झपाट्याने वाढू शकतात. तुमचे आरोग्य बिघडू शकते.
मंगळाच्या गोचरमुळे आत्मविश्वास कमी राहणार आहे. रागामुळे केलेले कामही बिघडू शकते. मानसिक तणाव वाढू शकतो. पैसा खर्च वाढेल. अचानक व्यवसायाशी संबंधित सहलीला जावे लागेल, जो तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकतो. सुख-समृद्धी कमी होण्याची शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )