Mangal Guru Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये एका ठराविका कालावधीनंतर त्यांची राशी बदलतात. वेगवेगळ्या कालखंडात राशीच्या ग्रहांच्या हालचालींमुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. नुकताच मंगळ ग्रहाने कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश केला आहे. 1 जुलै रोजी मंगळ ग्रहाने गोचर केलंय.
दरम्यान मंगळाच्या या गोचरनंतर त्याची गुरु ग्रहासोबत युती होतेय. यामुळे नवपंचम राजयोग तयार होतोय. वैदिक ज्योतिषशास्त्रातील हा अत्यंत शक्तिशाली राजयोग आहे. मंगळ आणि गुरुची ही युती काही राशींना सकारात्मक परिणाम देणार आहे.
मंगळ आणि गुरूच्या युतीचा सकारात्मक परिणाम मेष राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या युतीमुळे व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळू शकणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना उच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा येणार आहे. व्यावसायिकांनाही या काळात विशेष लाभ होईल. सरकारी क्षेत्रातही नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे.
मंगळ आणि गुरुच्या युतीच्या फायदा कर्क राशीच्या लोकांना होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये या राशींना यश मिळण्याची शक्यता आहे. मंगळ तुम्हाला आर्थिक लाभ देईल आणि अडकलेले पैसे परत मिळणे देखील शक्य होईल. कुटुंबामध्ये सुख-समृद्धी असेल. या काळात नवीन वाहन खरेदी करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुरू आणि मंगळाची युती लाभदायक ठरेल. या काळात व्यक्तींच्या भाग्यात कमालीची वाढ होईल आणि सर्व रखडलेली कामे सुधारणार आहेत. करिअरमध्ये यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशातही जाऊ शकतात. धार्मिक आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचीही भरभराट होण्याीची शक्यता आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ही युती फलदायी ठरेल. बरेच दिवस थांबलेली कामं पूर्ण होतील. रखडलेले पैसे यावेळी परत मिळू शकतात. आध्यात्मिक कार्यात चांगला वेळ जाणार आहे. तुम्ही नवीन वाहन इत्यादी खरेदी करू शकता. वैयक्तिक कामं शांततेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक सहकार्य मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )