Mangal Gochar : मंगळ गोचरचा 'या' राशींवर पडणार वाईट प्रभाव; आर्थिक गणितं बिघडणार

Mangal Gochar : सध्या मंगळ बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करताना दिसतोय. हे गोचर 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना वाईट परिणाम मिळणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 7, 2023, 05:40 AM IST
Mangal Gochar : मंगळ गोचरचा 'या' राशींवर पडणार वाईट प्रभाव; आर्थिक गणितं बिघडणार title=

Mangal Gochar : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये परिवर्तन करतो. ग्रहांच्या या राशीबदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. याचा रोजच्या निर्णयांवर, कामापासून ते मोठ्या निर्णयांपर्यंत त्याचा परिणाम होतो. 

नुकतंच मंगळ ग्रहाने गोचर केलं आहे. सध्या मंगळ बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करताना दिसतोय. हे गोचर 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना वाईट परिणाम मिळणार आहे. या काळात न्यायालयाशी संबंधित कामावर परिणाम होताना दिसणार आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत, ज्यांच्यावर मंगळाच्या गोचरचा विपरीत परिणाम दिसून येणार आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर चिंतेने भरलेले असणार आहे. व्यवसाय आणि कोर्टाशी संबंधित चिंता अधिक असणार आहे. शारीरिक समस्याही तुम्हाला सतत त्रास देत राहतील. सतत तुम्हाला भविष्याची चिंता सतावणार आहे. 

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांच्या मनात संभ्रम राहील. कोणत्याही कारणाशिवाय या राशीचे लोक शोकसागरात बुडून जाणार आहेत. या काळात काही वाईट बातम्याही मिळू शकतात. अपघात आदी परिस्थितीही उद्भवू शकते. रक्तदाबामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका. 

तूळ रास

या राशीच्या राशीच्या लोकांसाठी या मार्गक्रमणात आर्थिक समस्या वाढू शकतात. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. काम आणि व्यवसायात मोठे बदल सध्या टाळा. तुमच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो.

धनु रास

व्यवसायाशी संबंधित कामात व्यत्यय या काळात राहील. तुमची काम पूर्ण होणार नाही. तुमच्याकडून चुकीच्या बोलण्यामुळे चालू असलेले कामही बिघडू शकतं. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

मकर रास

या राशीच्या राशीच्या लोकांना या गोचरदरम्यान वादात पराभवाला सामोरे जावे लागू शकते. न्यायालयाशी संबंधित वाद अधिक त्रासदायक ठरू शकतात. निर्णय तुमच्या विरोधात जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आजारपणावरही पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे.

मीन रास

या राशीच्या राशीच्या लोकांसाठी या काळात जोडीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होणार आहे. व्यवसायातील सहकाऱ्यांशी काही चूक होऊ शकते. या गोचरचा मीन राशीच्या लोकांच्या नात्यावर वाईट परिणाम होणार आहे. वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात करिअरमध्ये चढ-उतार असतील.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )