Ast Mangal Gochar 2023: ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह उदय आणि अस्त होतात. यामध्ये मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:26 वाजता मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. अग्नि घटक ग्रहांमध्ये सूर्यानंतर मंगळ हा दुसरा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो.
जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ असतो तेव्हा तो आपली शक्ती गमावतो. ज्योतिषशास्त्रामध्ये याला ग्रहांचं अस्त होणं मानलं जातं. अस्त अवस्थेत ग्रह अत्यंत कमकुवत आणि शक्तीहीन असतात. या स्थितीत असताना ग्रह शुभ किंवा अशुभ परिणाम देऊ शकत नाही. मंगळांच्या अस्तानंतर काही राशींना अनेक समस्यांपासून आराम मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या कोणत्या लोकांना मंगळाच्या अस्तामुळे आराम मिळणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ हा सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे आणि तुमच्या चौथ्या भावात बसणार आहे. या काळात तुमच्या मालमत्तेशी संबंधित समस्या कमी होणार आहे. मालमत्तेचे विवाद असतील तर ते तुम्ही सोडवू शकाल. कुटुंबातील कलहाचे वातावरण कमी होईल नोकरीच्या बाबतीतही उच्च अधिकार्यांशी वाद संपतील आणि तुम्ही शांततेने प्रकरण सोडवू शकाल. आर्थिक लाभासोबतच खर्चातही वाढ होऊ शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळ तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. अशा स्थितीत तुमचे आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. उत्साहाने आणि घाई न करता विचारपूर्वक पावलं उचलाल. भागीदारी व्यवसायातही प्रगतीची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होऊ शकतो. या काळात तुमचे काम सहज पूर्ण होईल आणि तुम्हाला जास्त कष्ट किंवा त्रास सहन करावा लागणार नाही.
या राशीच्या लोकांसाठी मंगळ तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. या काळात तुमच्या कारकिर्दीत सुरू असलेली अनिश्चितता संपणार आहे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि त्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात फारसा फायदा होणार नाही, परंतु तिथल्या समस्यांपासून आराम मिळेल. या काळात तुम्हाला अचानक येणाऱ्या चढ-उतारांपासून आराम मिळेल. तुम्हाला जीवनात थोडी शांतता जाणवणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )