मुंबई : महामृत्युंजय मंत्र शंकराचा अतिशय आवडता मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप भगवान शिवाची स्तुती, साधना, जप, तपस्या करण्यासाठी केला जातो. याशिवाय शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि गंभीर आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास फायदा होऊ शकतो. असं मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या जवळ जाऊनही विजय मिळवता येतो. यामध्ये विशेषतः शिवाची स्तुती केली जाते. आज जाणून घेऊया या मंत्राचा जप करण्याचे फायदे.
महामृत्युंजय मंत्र
“ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥”
महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे फायदे
आयुष्य वाढवण्यासाठी - पृथ्वीवर आपण अधिक काळ जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत अधिक काळ व्यतीत करता यावा यासाठी महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने अकाली मृत्यूची भीती दूर होते.
चांगल्या आरोग्यासाठी- निरोगी आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने माणसाला गंभीर आजार होत नाहीत. तसेच रोगांचा नाश होतो. नियमित नामजप केल्याने माणूस निरोगी राहतो.
संपत्ती आणि वैभवासाठी - या मंत्राचा जप केल्याने माणसाला केवळ निरोगी शरीरच नाही, तर ऐश्वर्य, वैभव, सुख आणि सोयी प्राप्त होतात. तसेच भौतिक सुखे प्राप्त होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर शंकर प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीला माणसाला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
संततीप्राप्तीसाठी- संततीप्राप्तीसाठी महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप करावा. असं केल्याने माणूस कधीही बालसुखापासून वंचित राहत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)