Tirgrahi Yog : 1 ऑक्टोबर रोजी चमकणार 'या' राशींचं नशीब; त्रिग्रही योग करणार मालामाल

Tirgrahi Yog In Knaya : 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 29, 2023, 07:40 AM IST
Tirgrahi Yog : 1 ऑक्टोबर रोजी चमकणार 'या' राशींचं नशीब; त्रिग्रही योग करणार मालामाल title=

Tirgrahi Yog In Knaya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट वेळी संक्रमण करतात. ग्रहांच्या या राशी बदलामुळे अनेक योग तयार होतात. अनेकदा एका राशीत तीन ग्रहांच्या येण्याने त्रिग्रही योग तयार होतो. या योगाचाना मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. असाच त्रिग्रही योग ऑक्टोबरमध्ये तयार होणार आहे. 

येत्या 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेत चांगल्या गोष्टी घडणार आहे. जाणून घेऊया त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 

कन्या रास (Kanya Zodiac)

त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. या काळात तुम्ही तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू शकाल. भौतिक सुखसोयी मिळविण्याची तुमची इच्छा वाढणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग तयार होऊ शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या कर्म घरावर तयार होणार आहे. त्यामुळे रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमचं उत्पन्नही वाढेल. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. जर नोकरदार लोक बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर तुम्हाला यावेळी अनेक उत्तम संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो.

मकर रास (Makar Zodiac)

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. यावेळी तुमच्या कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या राशीच्या लोकांना परदेशातही नोकरीच्या संधी मिळू शकतात.  कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )