Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग बनताना दिसतात. अशातच येत्या काळात ग्रहांचा राजकुमार बुध 2 एप्रिल रोजी मेष राशीमध्ये वक्री गतीने प्रवेश करेल. याशिवाय 9 एप्रिल रोजी प्रतिगामी गतीने मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावेळी बुध मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा शुक्र आणि सूर्यासोबत युती होणार आहे.
यावेळी मीन राशीत शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या दोन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशी आहेत.
लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल. तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. या कालावधीत तुमची गुंतवणूक नफा देईल. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हे राजयोग तयार झाल्याने राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल.
लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. करिअरच्या आघाडीवरही तुम्हाला चांगले यश मिळेल आणि तुमची व्याप्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यापैकी अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.
बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून आठव्या भावात तयार होणार आहे. व्यापारी वर्ग आपला व्यवसाय वाढवू शकतो. यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत. गुंतवणूक आणि मालमत्तेतून लाभ मिळू शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )