मुंबई : भारतीय ज्योतिषशास्त्रात जन्मवेळेचे महत्त्व अधिक आहे. जन्मवेळेनुसार त्या त्या व्यक्तीची कुंडली बनवली जाते. ज्याचे आपल्या जीवनात महत्त्व असते. तसेच त्यात भविष्यातील लेखाजोगा मांडलेला असता. तर जाणून घ्या तुमच्या जन्मवेळेवरुन स्वभाव तसेच भविष्यातील लेखाजोगा
जन्मवेळ सकाळी ४ ते ६ - ज्या व्यक्तींचा जन्म सकाळी ४ ते ६ दरम्यान झाला आहे त्या व्यक्ती खूप भाग्यशाली असतात. यांचे आरोग्य चांगेल असते. कोणत्याही गोष्टीबाबत गंभीर असतात. तसेच यांचे भविष्य चांगले असते.
जन्मवेळ सकाळी ६ ते ८ - ज्यांचा जन्म सकाळी ६ ते ८ या वेळेत झालाय त्यांचा सूर्य १२व्या घरात असतो. यामुळे तुमच्या आयुष्यात असे काही रहस्यपूर्ण बदल होतो ज्याची व्याख्या करणे कठीण आहे.
जन्मवेळ सकाळी ८ ते १० - ज्यांचा जन्म सकाळी ८ ते १० दरम्यान झालेला असतो त्यांचा सूर्य ११व्या घरात असतो. याचा अर्थ की तुमचा मित्रपरिवार मोठा असेल. तुमचा अधिकतर वेळ हा शुभचिंतक तसेच मित्रमैत्रिणींकडून हाल हवाल जाणून घेण्यातच जाईल.
सकाळी १० ते १२ - ज्यांचा जन्म सकाळी १० ते १२ या वेळेत होतो त्यांचा सूर्य १०व्या घरात असतो. यांचे प्रोजेक्ट्स तसेच प्लान पूर्ण होतात. जगाच्या नजरेत तुम्ही सर्वोत्कृष्ट सिद्ध व्हाल.
जन्मवेळ दुपारी १२ ते २ - ज्यांचा जन्म दुपारी १२ ते २ वाजता झालाय त्यांचा सूर्य ९व्या घरात असतो. सूर्याची ही स्थिती म्हणजे प्रवासांनी भरलेले जीवन, धार्मिक, बुद्धिमान, परोपकारी स्वभाव आणि प्रसिद्ध होण्याच्या दिशेने संकेत देते.
जन्मवेळ दुपारी २ ते ४ - या वेळेत जन्मलेल्या व्यक्तींचा सूर्य आठव्या घरात असतो. या व्यक्तींना कर्ज, ट्रस्ट, सार्वजनिक फंड, बँक यात थोडी समस्या येऊ शकते. मात्र मेहनतीच्या जोरावर तुम्ही ही समस्या दूर करता.
जन्मवेळ दुपारी ४ ते ६ - ज्यांचा जन्म या वेळेत झालाय यांचा सूर्य सातव्या घरात असतो. लग्न हे इतरांच्या तुलनेत या व्यक्तींना अधिक प्रभावित करे. यासाठी वैवाहिक जीवन अधिक यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करा.
जन्मवेळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ - या वेळेत जन्मणाऱ्या व्यक्तींचा सूर्य़ सहाव्य घरात असतो. या व्यक्ती समाजसेवेला अधिक प्राधान्य देणाऱ्या असतात. अत्याधिक सतर्कता आणि परिश्रम करणारे असल्याने या व्यक्तींना दीर्घकाळ यश मिळते.
रात्री ८ ते १० - ज्यांचा जन्म या वेळेत झाला त्यांचा सूर्य पाचव्या घरात असतो. याचा अर्थ या व्यक्ती जीवनात अधिक आशावादी असतात. एखाद्याची आवड असेल तर त्या व्यवसायात त्यांना यश मिळते.
रात्री १० ते १२ - ज्यांचा जन्म रात्री १० ते १२ या वेळेत झाला यांचा सूर्य चौथ्या घरात असतो. या व्यक्तींना जमीन, रिअल इस्टेटमध्ये अधिक यश मिळते.
रात्री १२ ते २ - ज्या व्यक्तींचा जन्म या वेळेत झालाय त्यांचा सूर्य तिसऱ्या घरात अशतो. या व्यक्ती पत्रकारिता वा टीव्ही जर्नालिझम क्षेत्रात यश मिळवू शकतात.
रात्री २ ते ४ - या व्यक्तींचा सूर्य दुसऱ्या घरात असतो. हे अर्थ आणि कुटुंबाचे घर आहे. या व्यक्ती महान वक्ता होऊ शकतात. ज्यामुळे समाजातही तुम्हाला चांगला मानसन्मन मिळेल.