नावाच्या अक्षरावरुन जाणून घ्या १२ राशींपैकी या ४ राशी असतात भाग्यवान

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो तीच रास त्या व्यक्तीची नावरस असते. याला चंद्ररासही म्हणतात. 

Updated: May 23, 2018, 01:07 PM IST
नावाच्या अक्षरावरुन जाणून घ्या १२ राशींपैकी या ४ राशी असतात भाग्यवान title=

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो तीच रास त्या व्यक्तीची नावरस असते. याला चंद्ररासही म्हणतात. चंद्रराशीनुसार सर्व १२ राशींसाठी विविध अक्षरे सांगण्यात आलीत. नावाच्या पहिल्या अक्षरावरुन त्या व्यक्तीची रास समजते. तसेच त्याचे भविष्य आणि स्वभावाची माहितीही मिळते. मात्र काही राशी अशा आहेत की ज्या इतर राशींच्या तुलनेत अधिक ताकदवर आणि भाग्यवानअसतात. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी

मेष रास - (नावाची अक्षरे - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)

राशीचक्रातील ही पहिली रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ असतो. मंगळ ग्रहांचा सेनापती असतो. या कारणामुळेच या राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्वक्षमतेचे गुण असतात. या क्षमतेमुळे या व्यक्ती दुसऱ्या राशींच्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक ताकदवर असतात. या व्यक्ती मेहनती असतात त्यासोबतच त्यांच्यातील नेतृत्वक्षमतेमुळे ते अधिक यशस्वी होतात आणि भाग्यवान ठरतात.

वृश्चिक रास - (नावाची अक्षरे - तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)

मेष राशीप्रमाणेच वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ असतो. मंगळामुळे ही रास साहसी असते. या राशीच्या व्यक्ती कोणत्याही कामात जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. आपले काम इमानदारीने करतात. आपल्या मेहनतीने या राशी अधिक शक्तीशाली बनतात. बनवलेल्या योजनांमध्ये या व्यक्ती यशस्वी होतात.

मकर रास - (नावाची अक्षरे - भो, जा, जी, खी, खू, खा, खो, गा, गी)

ग्रहांमध्ये शनिचे सगळ्यात वेगळे स्थान आहे. हा ग्रहांचा न्यायाधीश आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे. या कारणामुळेच मकर राशींच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. या राशीच्या व्यक्ती आत्मविश्वासू असतात. यांच्या चांगल्या नेतृत्वक्षमतेचे गुण असतात. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे कोणत्याही कामात चांगले यश मिळवतात.

कुंभ रास - (नावाचे अक्षर - गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा)

ही राशी चक्रातील अकरावी रास आहे. यांचा स्वामी शनी असते. कुंभ राशीच्या व्यक्तींना इमानदारीने काम केल्यास शनीदेव त्यांना भरपूर साथ देतो आणि आपल्या कार्यात ते त्यांना उच्च शिखरावर नेऊन ठेवतात. या व्यक्ती बुद्धिमान असतात. याच कारणांमुळे इतर राशींच्या तुलनेत या अधिक शक्तीशाली असतात.