Kalawa Rules : 'या' 2 राशींच्या व्यक्तींना हातात बांधू नये लाल धागा, फायद्याऐवजी होईल नुकसान

Kalawa Rules : आपल्या सनातन धर्मात लाल रंग शुभ मानला जातो. धार्मिक विधीपूर्वी मनगटावर लाल धागा बांधला जातो. लाल कलावामध्ये तीन धागे असतात. जे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं.

Updated: May 29, 2023, 09:47 PM IST
Kalawa Rules : 'या' 2 राशींच्या व्यक्तींना हातात बांधू नये लाल धागा, फायद्याऐवजी होईल नुकसान title=

Kalawa Rules : हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक विधीपूर्वी मनगटावर लाल धागा बांधलेला तुम्ही पाहिला असेल या लाल धाग्याला कलावा आणि माऊली असेही म्हटलं जातं. खासकरून करुन पुरोहिताच्या हाताने मंत्रोच्चारात हा धागा बांधण्याची पद्धत असते. लाल कलावामध्ये तीन धागे असतात. जे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं.

आपल्या सनातन धर्मात लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. शास्त्रामध्ये लाल कलावाचे फायदे सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत. शिवाय यामध्ये 2 राशीच्या व्यक्तींनी हा लाल कलावा हातात बांधू नये असंही म्हटलं आहे. जाणून घेऊया या 2 राशी कोणत्या आहेत. 

लाल धागा बांधल्याने काय फायदे होतात?

धार्मिक मान्यतेनुसार, हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जर तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तर ती सुधारण्यास मदत होते. याचसोबत हनुमानजींची कृपाही तुमच्यावर राहते. ज्योतिष्य शास्त्रानुसार, मंगळाचा रंग लाल आहे त्यामुळे लाल रंग बांधल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होण्यास मदत होते. 

या राशींनी हाताता बांधू नये कलावा

ज्योतिष्य शास्त्रामध्ये कलावा बांधण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये काही राशीच्या व्यक्तींनी हातामध्ये हा धागा बांधू नये असं म्हणतात. ज्योतिषांच्या मते मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल कलावा बांधू नये. 

का बांधू नये लाल कलावा?

मकर आणि कुंभ राशींच्या व्यक्तींनी हातामध्ये कलावा बांधू नये. या दोन राशींचा स्वामी न्यायदेवता शनिदेव आहेत. लाल रंग शनिदेवाला आवडत नाही. अशात जर मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल कलावा बांधला तर शनिदेव नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी शक्यतो हातात हा धागा बांधू नये.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )