Chanakya Niti for successful life: आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक तथ्य मांडली आहे. त्या काळात चाणक्य नीतित लिहिलेली तथ्य आजही तंतोतंत लागू होत आहेत. आचार्य चाणक्य यांनी जीवन जगण्याचे असे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यांनी सांगितलेल्या नियमांचं पालन केल्यास माणूस चांगले जीवन जगू शकतो. कधी कधी आपण नकळत अशा लोकांसोबत जीवन जगतो, त्यामुळे आपल्या अडचणीत वाढ होते. आपलं जीवन दुःखाने भरून जाते. अशा परिस्थितीत या लोकांपासून वेळीच अंतर ठेवणे चांगले.
आचार्य चाणक्य यांनी कटू शब्दात आपली भाकितं मांडली आहेत. आचार्य चाणक्य यांनी काही लोकांना त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. नाहीतर या लोकांच्या संगतीने सुखी माणसाचे आयुष्य दु:खाने भरून जाते.
मुर्ख शिष्य : गुरू कितीही कर्तृत्ववान असला, त्याची ख्याती कितीही असली तरी त्याचा एखादा शिष्य मुर्ख असेल तर गुरूचे जीवन दुःखी व्हायला वेळ लागत नाही. मूर्ख शिष्य आपल्या मूर्खपणामुळे गुरूच्या जीवनात अनेक अडथळे आणतात.
दुःखी आणि आजारी लोकांमध्ये राहणारी व्यक्ती: शिकलेली आणि आनंदी असूनही सतत दुःखी आणि आजारी लोकांसोबत राहणारी व्यक्ती काही वेळात निराशेच्या गर्तेत जाते. त्याचं आयुष्यही दु:खात जाऊ लागतं.
दुष्ट स्त्री: ज्याप्रमाणे चांगल्या, सुसंस्कृत, शिक्षित स्त्रीचा सहवास पुरुषाचे जीवन यश आणि आनंदाने भरते. त्याचप्रमाणे दुष्ट स्त्रीचा सहवास अनेक अडचणी वाढवते. जर पत्नी दुष्ट, भांडण करणारी असेल तर जगातील कोणतेही सुख आणि धन जीवनातील दुःख कमी करू शकत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)