साध्या आणि सोज्वळ महिला कशा ओळखाल? सांगतंय समुद्र शास्त्र

तुमच्या नजरेत असे गुण असलेली महिला आलीये का? आली असेल तर समजा....   

Updated: Feb 28, 2022, 02:49 PM IST
साध्या आणि सोज्वळ महिला कशा ओळखाल? सांगतंय समुद्र शास्त्र  title=

मुंबई : समुद्र शास्त्रात शरीरावर असलेल्या तीळाला फार महत्त्व आहे. शरीरावर वेग-वेगळ्या भागांवर तीळ असतात आणि त्याचं महत्त्व देखील फार मोठ आहे. समुद्र शास्त्रानुसार तीळ भविष्यातील अनेक गोष्टींचं संकेत देतात. शरीरावर असलेल्या तीळाने हे देखील साध्य होतं की, भविष्यात व्यक्ती किती नशीबवान असेल. 

डोळ्यात तीळ 
समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांच्या डोळ्यात तील असतो, त्या प्रचंड नशीबवान असतात. अशा महिलांचं वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखी असतं. 

डोक्यावर तीळ
समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळावर मध्यभागी तीळ असतो. या महिला आपल्या पतीवर प्रचंड करतात. याशिवाय महिला आपल्या प्रियकराची देखील काळजी करतात. 

गुडघ्यावर तीळ 
समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांच्या गुडघ्यावर तीळ असतो, अशा महिला रोमँटीक असतात. उजव्या गुडघ्यावर तीळ असेल तर त्या महिलेचं  वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखी असतं आणि डाव्या गुडघ्यावर तीळ असेल तर त्या महिलांना प्रेमात यश मिळतं. 

ओठांवर तीळ
ओठांवर तीळ असणं प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर तीळ असेल तर अशी महिला रोमँटीक असते. 

मानेवर तीळ
समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवरवर तीळ असतो अशा महिला प्रचंड नशीबवान असतात. महिलेचं  वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखी असतं एवढंच नाही तर या महिलांना प्रेमात यश मिळतं. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)