मुंबई: येणाऱ्या समस्यांची चाहूल आधीच लागली तर आपल्याला त्यावर तोडगा काढणं आणखीन सोपं होतं. त्यासाठी जाणून घ्या कसं असेल 12 राशींसाठीचं आजच्या दिवसाचं राशीभविष्य.
मेष- कुटुंबातील सदस्यांची आज काळजी घ्या. चालण्य़ामुळे आज आपण दिवसभर उत्साही राहाल.
वृषभ - मित्रांसोबत आजची संध्याकाळ खूप सुंदर जाईल. मद्यसेवानापासून दूर राहा. आपल्या प्रिय व्यक्तीचा मूड पाहून आज आपण वागायला हवं.
मिथुन - रात्री उशिरापर्यंत काम करणं टाळा. कामादरम्यान थोडी विश्रांती द्या. रिकाम्या वेळेचा योग्य सद्उपयोग करा.
कर्क - घरकाम करताना विशेष काळजी घ्या. व्यापाऱ्यांना आज दिवसभरात फायदा होईल. प्रेमात घाई करून घेतलेला निर्णय धोक्याचा ठरेल.
सिंह- आशावादी व्हा, आपला आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्या. आज आपण प्रेमात पडू शकता. वेळेचा योग्य वापर करा.
कन्या- आजचा दिवस ऊर्जेनं भरलेला असणार आहे. आज आपल्या जोडीदारासोबत वेळ खूप चांगला जाईल.
तूळ - द्वेषाची भावना आज आपल्याला महागात पडेल. आज आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. जोडीदाराला भावनिक ब्लॅकमेल करणं आज टाळा.
वृश्चिक - गर्भवती महिलांनी आज विशेष काळी घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे आज चांगला पैसा आला तरी खर्चातही वाढ होईल.
धनु- आज आपल्या प्रिय व्यक्तीला राग येऊ शकतो. काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मकर - तणाव आणि मतभेदामुळे आज आपण चिडचिडे व्हाल. न बोलवूनही पाहुणे आल्यामुळे आज आपल्याला राग येईल. आर्थिक फायदा होऊ शकतो.
कुंभ - व्यवसाय, कामाच्या ठिकाणी आपला आर्थिक फायदा होईल.
मीन- आज आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल.