राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला दिवस

असा असेल आजचा दिवस 

Updated: Mar 3, 2021, 07:07 AM IST
राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला दिवस title=

मेष - एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर ती आज मिळण्याची शक्यता आहे. तुमचा दिवस आज चांगला आहे. प्रत्येक कामात मोठ्यांचा सल्ला घ्याल. 

वृषभ - तुम्ही दिलेले सल्ले इतरांना प्रभावीत करतील. अडचणीत असलेल्या काम पूर्ण कण्यास यश मिळेल. विचार करण्याचा मार्ग बदला. मित्रांकडून मदत मिळेल. दिवस चांगला जाईल

मिथुन - नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क - स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.विचार केलेली कामे  पूर्ण करण्यात वे लागेल. पण यश अटळ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.

कन्या - महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील. 

तूळ : दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल. 

तूळ : दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल. 

वृश्चिक : नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.

धनु : तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्यावर विचार केलात तर फायदा होईल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.

मकर : नोकरदार वर्गाने थोडा संयम बाळगावा. सहकार्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडूनही मदत मिळेल. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत. व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी. 

कुंभ : आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. आरोग्याकडे लक्ष द्या. 

मीन :  वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे.