मेष - आज मेष राशीची जबाबदारी वाढले. घरी असलेल्या लहान मुलांची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही विषय खूप समजूतदारपणे सोडवले गेले पाहिजेत. यासाठी संयम बाळगा. भविष्यात खूप चांगला काळ येणार आहे. संकटांशी लढण्यासाठी काही तयारी महत्वाची आहे.
वृषभ - जुनी दुखणी दूर करण्यासाठी आता संयमाने वागण महत्वाचं आहे. लॉकडाऊन तुम्हाला संयम शिकवणार आहे. स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्या. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.
मिथुन - स्वतःला आवडत्या कामात व्यस्त ठेवा. हे ही दिवस निघून जातील हे लक्षात ठेवा. खूप दिवसानंतर असा वेळ मिळाला आहे. जो फक्त तुमचा आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा.
कर्क - रखडलेला पैसा पुन्हा मिळण्याचा योग जुळून आलाय. कुटुंबासोबतचा हा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. सहनशक्ती हा सध्याचा मुलमंत्र आहे.
सिंह : पैसे कमावण्यात यश मिळेल. जास्त काम करुन कोणाची तरी मदत कराल. जुनी काही प्रकरण डोकं वर काढतील. दुसऱ्यांचा दृष्टीकोन समजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणत्या तरी चांगल्या बातमीची वाट पाहाल.
कन्या : आजचा दिवस चांगला आहे. स्वत:च्या भावनांना आवर घातलात तर फायदा होईल. मैत्रिणीसोबत चांगल्या गप्पा होतील. अशा व्यक्तींकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. वेळेवर कामं पूर्ण होतील.
तूळ : तूळ राशीचे लोकं आपली सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतील. हिम्मत आणि विचार बिघडलेली स्थिती सुधारण्यास मदत करतील. कामात मन लागेल. तुम्हाला संयम ठेवावा लागेल.
वृश्चिक : खूप काम सहज पूर्ण होतील. जी कामं अडली आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल. कामकाजात यश मिळेल. तुम्ही खूप सारी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
धनु : आज अशी काम पूर्ण कराल ज्यांचे खूप दिवसांपासून तुम्ही प्लानिंग करत होतात. तुम्ही गोड बोलून सर्व काम पूर्ण करुन घ्याल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
मकर - या लॉकडाऊनच्या काळात काही महत्वाची काम करून घ्या. तसेच कुटुंबाची काळजी घ्या.
कुंभ - समजुतदारपणे आज तुम्हाला दाखवावा लागेल. धनलाभ होण्याचा योग आहे. पुढे जाण्यासाठी काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील.
मीन - तुम्ही संयम बाळगा. सध्या कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. स्वतःला कामात व्यस्त ठेवा.