राशीभविष्य : 'या' राशींसाठी फलदायी ठरणार यंदाचा दसरा

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस... 

Updated: Oct 25, 2020, 07:12 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींसाठी फलदायी ठरणार यंदाचा दसरा  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही अडीअडचणीची कामं पूर्ण करा. व्यापार आणि नोकरीत यश मिळणार आहे. समाजात मान मिळेल.

वृषभ- दिवस कामातच व्यग्र असेल. सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. एखादी शुभवार्ता मिळेल. 

मिथुन- व्यापार आणि नोकरीमध्ये कुटुंबाची मदत मिळेल. विचार सकारात्मक ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. विश्वासार्ह व्यक्तीची मदत मिळेल. 

कर्क- नव्या व्यापारावर लक्ष द्या. लाभ होईल. व्यवहार कौशल्याचा फायदा मिळेल. आरोग्य सुधारेल. जुने आजार दूर होतील. 

सिंह- व्यापारात नवे बेत आखण्याची संधी मिळेल. जोडीदाराची मदत मिळेल. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. 

कन्या- नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. मानसिक शांतता मिळेलय. या मंगलपर्वावर विश्वास ठेवा. 

तुळ- कर्जातून मुक्त व्हाल. काम पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. नवं काम हाती घ्याल. तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल होतील. 

वृश्चिक- व्यापार चांगला होईल. तुमचं एखादं काम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्या. नव्या गुंतवणुकीचे बेत आखाल. अचानक एखादं काम पूर्ण होईल. 

धनु- नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी आहे. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. थकवा जाणवू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर- आर्थिक बाबतीत फायदा होईल. कामावर लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल आणि एखादी शुवार्ताही मिळेल. 

 

कुंभ- व्यापारा आणि नोकरीत आत्मविश्वासाच्या बळावर पुढे जाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- आज तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. अनिमित दिनचर्येमुळं त्रास होईल. कामाचा व्याप वाढेल. पण, तेसुद्धा निभावून न्याल.