Horoscope : या तीन राशींच्या लोकांनी सावधान! कष्टांनी भरलेला आहे शनिवार

असा असेल आजचा दिवस 

Updated: Jun 19, 2021, 06:24 AM IST
Horoscope : या तीन राशींच्या लोकांनी सावधान! कष्टांनी भरलेला आहे शनिवार  title=

मुंबई : हिंदू पंचांगानुसार, शनिवार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्ष नवमी तिथी आहे. या दिवशी महेश नवमी पर्व आहे. ज्यामध्ये चंद्रमा कन्या राशीत आहे. या दरम्यान मिथुन, तूळ आणि मीन राशींच्या व्यक्तींचे दिवस चांगला जाईल की नाही यात शंका आहे. 

मेष : तुमचं मन प्रसन्न राहेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवास होईल. कामात चांगला फायदा होईल. तुमचं आरोग्य चांगल राहील. 

वृषभ : आजचा दिवस भरपूर ऊर्जेने भरलेला आहे. कामातील मेहनत आज यश देईल. कोणत्याही लग्नाच्या कार्यात सहभागी व्हाल. मनात प्रसन्नता असेल. प्रेम संबंधात संवेदनशीलता जाणवेल. 

मिथुन : आजचा दिवस चांगला असेल. काम असेल अथवा कौटुंबिक सुख आजचा दिवस चांगला असेल. दिवसाची सुरूवात प्रसन्नतेने होईल. 

मिथुन - आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. उत्साही राहाल. नवीन विचार मनात येतील. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला ठरु शकतो.   

कर्क -उत्साही राहाल. नवीन लोकांशी जोडले जाल. नातेसंबंधांबाबत काही गोष्टी खास ठरतील. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा. 

सिंह - तुमच्या मदतीने एखाद्याची समस्या सुटू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहिल. काही गोष्टींचा खोलवर विचार कराल. मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. 

कन्या - व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात. 

तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यश मिळेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. इतरांना नाराज न करता काम करा. जोडीदारावर रागवू नका. खर्च होऊ शकतो.

वृश्चिक - अचानक मित्रांची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. जोडीदाराकडून आर्थिक मदत होऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी नवीन डील होऊ शकते. सामाजिक कामात सन्मान वाढेल. 

धनु - व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात. 

मकर - कोणतंही कामं घाईत करु नका. पैशांबाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. पैशांसंबंधी सावध राहा. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. 

कुंभ - कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. मेहनतीने धन वाढण्याची शक्यता आहे. राहिलेली कामं पूर्ण करा. दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे. पुढे जाण्यासाठी काही बदल करणं फायद्याचं ठरु शकतं. 

मीन -  व्यवसायात फायदा कमी होण्याची शक्यता आहे. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नव्या कामाची शक्यतो सुरुवात करु नका. प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.