राशीभविष्य : 'या' राशींसाठी आजचा दिवस कमालीचा शुभसूचक

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस

Updated: Oct 18, 2020, 07:27 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींसाठी आजचा दिवस कमालीचा शुभसूचक title=
संग्रहित छायाचित्र

मेष- कमालीच्या आत्मविश्वासाच्या बळावर अडचणीची सर्व कामं मार्गी लावाल. आर्थिक चणचण संपुष्टात येईल. करिअरमध्ये पुढं जाण्याच्या संधी आहेत. खर्च वाढेल, त्यावर मात्र नियंत्रण ठेवा. 

वृषभ- आजचा दिवस प्रचंड काम करावं लागणार आहे. मेहनत करण्यासाठी तयार राहा. मेहनतीचं फळ चांगलंच असणार आहे. काही अडचणी दूर होतील. 

मिथुन- व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा फायदा होणार आहे. प्रगतीचे सर्व मार्ग खुले आहेत. संधी ओळखा आणि पुढं जा. तुमच्या भावना विचारात घेतल्या जातील. 

कर्क- नव्या व्यापारांकडे आकर्षित व्हाल. नोकरीच्या बाबतीत काही बदल घडून येतील. एखादं जुनं काम समोर येईल. ते पूर्ण करा. आरोग्य चांगलं राहील. 

सिंह- व्यापारासाठी नवे बेत आखले जातील. त्यावर काम करुन यशाचा मार्ग सापडेल. तुमच्या प्रयत्नांना सहजपणे यश मिळणार आहे. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

कन्या- नोकरी आणि व्यापारामध्ये आजचा दिवस फायद्याचा आहे. अनेक वाद मिटतील. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. नवं वाहन खरेदी कराल. 

तुळ- कर्जापासून मुक्त व्हाल. मित्र, नातेवाईक यांची भेट घडणार आहे. सकारात्मक घटनांनी आजचा दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. 

वृश्चिक- व्यवसायात चांगला फायदा होणार आहे. व्यक्तिगत अडचणी दूर होतील. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मोलाचा सल्ला मिळेल. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लक्ष द्या. 

धनु- नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे. व्यापारावर लक्ष द्या. तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

 

मकर- आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. 

कुंभ- नव्या लोकांना भेटण्याची संधी आहे. आरोग्याची काळजी घ्या. विचाराधीन कामं पूर्ण होणार आहेत. जुने वाद मिटतील. आजचा दिवस बऱ्याच अंशी शुभसूचक आहे. 

मीन- अनियमित चर्चा फायद्याच्या ठरतील. आत्मविश्वाच्या बळावर पुढे जाण्याच्या संधी आहेत. आरोग्याची काळजी घ्या.