राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशीबाची साथ

व्यापार आणि नोकरीत होणार फायदा   

Updated: Oct 13, 2020, 07:00 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशीबाची साथ  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मदत मिळणार आहे. आज फार काम करावं लागणार आहे. पण, घाबरुन जाऊ नका. नवं घर खरेदी करण्याची इच्छा होईल. 

वृषभ- व्यापार बेताचाच असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमीन- संपत्तीच्या व्यवहारांमध्ये फायदा होणार आहे. कर्ज फेडण्याची संधी आहे. वडिलांची मदत मिळेल. 

मिथुन- काही बाबतीत दुमत असल्यामुळं कामात मन रमणार नाही. एखादी चिंता सतावेल. एकाग्रता कमी असेल. पोटाच्या विकारांपासून दूर राहा. 

कर्क- नशीबाचा कल तुमच्याच दिशेनं आहे. जुनी कामं मार्गी लागतील. आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची मदत मिळेल. 

सिंह- काम आणि व्यवसायाच्या बाबतीत शत्रूवर मात कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. जुन्या मित्रांना भेटण्याची संधी आहे. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी प्रगती साधण्याचा योग आहे. व्यापारामध्ये धनलाभ होणार आहे. महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. 

तुळ- आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी एखादा नवा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय़ घ्यावा लागू शकतो. संधी मिळाली तर आराम करा. 

वृश्चिक- अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. वरिष्ठांना प्रभावित करण्यात यश मिळेल. एखाद्या आवडत्या व्यक्तीशी भेट घडेल. 

धनु- व्यापारात फायदा होणार आहे. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर, त्यात यश मिळणार आहे. खर्च वाढतील. 

मकर- व्यापारासाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो. नवी जबाबदारी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल.

 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये फायदा होणार आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. कामासाठीच्या मुलाखती यशस्वी ठरतील. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- कामाच्या पद्धतींमध्ये थोडे बदल घडून येतील. एखादं मवं काम हाती येईल. जबाबदारी वाढेल. दिवस चांगला आहे.