Todays Panchang : आजच्या दिवशी 'हा' मुहूर्त टळू देऊ नका; पाहा दैनंदिन पंचांग

Holi 2023 Panchang : अनेक ठिकाणी सोमवारी पार पडलेल्या होलिका दहनानंतर आज, मंगळवारी धुळवड असणार आहे. हा दिवसही ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वाचा   

Updated: Mar 7, 2023, 06:35 AM IST
Todays Panchang : आजच्या दिवशी 'हा' मुहूर्त टळू देऊ नका; पाहा दैनंदिन पंचांग  title=
Holi 7 march 2023 todays panchang mahurat

Holi 2023 Panchang : मोठ्या उत्साहात यंदाची होळी (Holi) पार पडली. ज्यानंतर आता सगळीकडे कल्ला सुरु आहे तो म्हणजे धुळवडीचा. रंगात न्हाऊन निघत बेभान होऊन या दिवसाचा आनंद घेणारे तुमच्या आमच्यासारखे अनेकजण असतील. आजचा दिवस आणखी खास कारण, अनेक नोकरदार मंडळींना सुट्टी. म्हणजेच आज घरात सगळीच मंडळी उपस्थित असतील. हीच उपस्थिती पाहून तुम्ही एखादं शुभकार्य करण्याची योजना आखली आहे का? 

काय म्हणता हो...? असं असेल तर उत्तमच. पण, त्याआधी आजच्या दिवसाविषयी पंचांगाच्या दृष्टीनं काहीशी महत्त्वाती माहितीसुद्धा पाहून घ्याच. कारण, पंचांहातूनही तुम्हाला काही शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा सहजपणे समजू शकतात. जितकं महत्त्वं आपण दैनंदिन राशीभविष्याला देतो तितकंच या पंचागालाही द्यावं. जिथून आपल्याला तिथी, नक्षत्र, योग या साऱ्याची माहिती मिळते. चला तर मग, पाहूया आजचं पंचांग... (Holi 7 march 2023 todays panchang mahurat )

आज होळी. वाईट प्रवृत्तींचा नाश करून एका नव्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्याचा संदेश देणारा हा सण. देशातील, राज्यातील विविध भागांमध्ये विविध पद्धतींनी होळी साजरी होत असतानाच आजच्या दिवसाच्या मुहूर्तांनाही तितकंच महत्त्वं आहे. 

नव्या महिन्यातील नवा आठवडा सुरु झाला असून, या नव्या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक नव्य़ा संधी मिळणार आहेत. या संधींचं सोनं नेमकं केव्हा कराल, एखादं शुभकार्य केव्हा कराल या साऱ्याचे संकेत तुम्हाला पंचांगातून मिळणार आहेत. कारण, दैनिक राशीभविष्याला जितकं महत्त्वं प्राप्त आहे, तितकंच महत्त्वं या पंचागालाही प्राप्त आहे. (Holi 2023 panchang todays mahurat and significance )

आजचा वार - मंगळवार   
तिथी- पौर्णिमा
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी   
योग - धृती
करण- भाव

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:40 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.24 वाजता
चंद्रोदय -  सायंकाळी 06.18 वाजता  
चंद्रास्त - पहाटे 06.43 वाजता  
चंद्र रास- सिंह  

आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त– 09:01 पासुन 09:48 पर्यंत
कुलिक– 13:42 पासुन 14:29 पर्यंत
कंटक– 07:27 पासुन 08:14 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 7 March 2023 : रखडलेली सर्व कामं होणार पूर्ण; या राशीच्या लोकांसाठी दिवस ठरणार अत्यंत लाभदायी

 

राहु काळ– 15:28 पासुन 16:56 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 09:01 पासुन 09:48 पर्यंत
यमघण्ट– 10:35 पासुन 11:22 पर्यंत
यमगण्ड– 09:36 पासुन 11:04 पर्यंत
गुलिक काळ– 12:32 पासुन 14:00 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:09 पासुन 12:55 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी

चंद्रबल- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)