मुंबई : वाईटावर चांगल्याचा विजय होण्याचं प्रतिक म्हणजे होलिका दहन १७ मार्च २०२२ रोजी होणार आहे. आज होलिका दहनची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा कमी कालावधीसाठी आहे. ९ वाजून २० मिनिटे ते १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. १ तास १० मिनिटांचा वेळ होलिका दहनाच्या विधीकरता शुभ मानला जाणार आहे. या दरम्यान कोणतीच चूक करू नका जी तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागेल.
होलिका दहन योग्य वेळीच करावे. अशुभ काळात होलिका दहन केल्याने अशुभ फळ मिळते. होलिका दहन हे नेहमी मोकळ्या वेळेतच करावे.
होलिका दहनाचे ठिकाण प्रथम गंगाजलाने पवित्र करावे व नंतर काठी मध्यभागी ठेवावी व त्याभोवती सुके गोवळे, सुकी लाकूड, सुके गवत ठेवावे. होलिकाची मूर्ती ठेवा.
पारंपरिक पूजा करा. पूजेत दिवे, उदबत्ती, माळा, ऊस, तांदूळ, काळे तीळ, कच्चा कापूस, पाणी आणि पापड अर्पण करा. याशिवाय तांदूळ, हरभरा आणि गव्हाचे झुमकेही घाला.
पूजेत हनुमान आणि शीतला मातेला प्रणाम करा. यानंतर अग्नी लावा आणि होलिका दहन करा.
होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या जागी एक ग्लासभर थंड पाणी घाला.
लहान मुलांना नजर लागू नये म्हणजे होलिका दहन खूप महत्वाचे असते. या दिवशी होलिका दहनमध्ये नारळ, सुपारी आणि एखादं नाणं अर्पण करावे.
यामुळे लहान मुलांचा मेंदू तेज होते. त्यांच्या मनात चुकीचे विचार येत नाहीत. तसेच ते वाईट नजरांपासून दूर राहतात. यामुळे लहान मुलांच्या जीवनात यश येतं.