मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयाला हरितालिका तृतीया साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात.
सर्व प्रथम हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरासाठी ठेवले होते. जर तुम्हीही हरतालिका तृतीयाचे व्रत करत असाल तर काही गोष्टी पूजेच्या साहित्यात समाविष्ट कराव्या लागतील. त्याशिवाय हरितालिका तृतीयाची पूजा अपूर्ण मानली जाते.
यावर्षी हरितालिका तृतीया 9 सप्टेंबर 2021 साजरी केली जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये, हरतालिका तृतीया गौरी हब्बा म्हणून ओळखली जाते आणि माता गौरीचे आशीर्वाद घेण्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस म्हणून पूजा केली जाते. या दिवशी महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात.
हरितालिका तृतीया पूजेसाठी आवश्यक वस्तू:
– केळीचे पान
– सौभाग्याचे साहित्य
– बेलपत्र
– धोत्र्याचे फळ आणि फूल
– फळ
– ओली काळी माती किंवा वाळू
– कापूर
– कलश
– मंजरी
– जनेऊ
– वस्त्र
– नारळ
– तूप-तेल
– सिंदूर
– कुंकू
– दिवा